Id SKU Name Cover Mp3
Vangmayeen Avalokan Vangmayeen Avalokan


60.00 116.00
Download Bookhungama App

वाङ्मयीन अवलोकन - डॉ. दत्तात्रय पुंडे

Description:

‘वाङ्मयीन निरीक्षणे’ (१९८९) या लेखसंग्रहाप्रमाणेच प्रस्तुत ‘वाङ्मयीन अवलोकन’ हा समीक्षा-लेखांचा संग्रह आहे. या संग्रहाविषयी

वाङ्मयीन निरीक्षणे’ (१९८९) या लेखसंग्रहाप्रमाणेच प्रस्तुतवाङ्मयीन अवलोकनहा माझा समीक्षा-लेखांचा संग्रह आहे. मराठीत स्फुट समीक्षा-लेखांचा संग्रह प्रकाशित करण्याची पूर्वापार परंपरा आहेच. त्याच परंपरेतला हा एक संग्रह आहे असे समजण्यास हरकत नाही.

या संग्रहातीलविविध अभ्यासक्रमांतील मराठीचे स्थानहा लेख काही समीक्षालेख नाही, हे उघडच आहे. तरीही तो येथे अंतर्भूत केलेला आहे. कारण मराठी वाङ्मयीन समीक्षाक्षेत्राचा विद्यापीठीय पातळीवरील मराठीच्या अभ्यासक्रमांशी एक अतूट नातेसंबंध आहे. निदान मराठीत तरी अशी स्थिती आहे, की विद्यापीठीय अभ्यासक्रमांनी मराठी समीक्षेचे पुनःपुन्हा भरणपोषण केलेले आहे. या अनुबंधामुळेच प्रस्तुत लेख या संग्रहात मुद्दाम समाविष्ट केलेला आहे.

आविष्कारस्वातंत्र्य : कलावंतांचे आणि सर्वांचेया लेखाचेही असेच आहे. हा लेख आपल्या वाङ्मयीन संस्कृतीसंबंधाने किंवा आपल्या एकूणच संस्कृतीविषयी काही विचार मांडणारा आहे. पुन्हा स्वातंत्र्याच्या अवकाशातच निकोप समीक्षा अस्तित्वात येऊ शकते, हेही आपण सारेच जाणतो आणि मुख्य म्हणजे मानतोही. म्हणून तोही लेख येथे समाविष्ट केलेला आहे.

या संग्रहातील काही लेख आदरणीय गुरुवर्य प्रा. गो. . कुलकर्णी यांनी वाचलेले आहेत. त्यांना हे लेख आवडल्यामुळे या लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्याची सूचना त्यांनी मला केली आणि त्यांची सूचना ही माझ्या लेखी आज्ञाच असल्याने मी ती मान्य केली. त्यामुळे हा समीक्षा-संग्रह निघण्याचे श्रेय एक प्रकारे त्यांनाच जाते.

येथील सर्वच लेख नियतकालिकांतून, संपादित ग्रंथांतून किंवा चर्चासत्रांतून या अगोदरच अभ्यासकांसमोर आलेले आहेत. हे लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकांच्या संपादकांचा, संपादित ग्रंथांच्या प्रकाशकांचा आणि चर्चासत्र संयोजकांचा मी आभारी आहे. हा ग्रंथ प्रकाशित करणारेउत्कर्ष प्रकाशनाचे श्री सुधाकर जोशी यांचा-माझा खूप जुना स्नेह आहे. त्यांचे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सविता जोशी यांचेही मी आभार मानतो. एच. एम. टाईपसेटर्सचे श्री. हेमंत जोशी व सौ. संगीता सरदेसाई यांनी या ग्रंथाच्या मुद्रणात जातीने लक्ष घातले. त्या दोघांचाही मी आभारी आहे.

चिपळूण येथील युनायटेड हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. भालचंद्र लक्ष्मण बरवे ऊर्फ मधुकाका बरवे आणि परांजपे हायस्कूलमध्ये (पूर्वीच्या श्रीराम हायस्कूलमध्ये) प्रशाला पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या सेवानिवृत्त सुविद्य पत्नी सौ. सुमतीताई या दोघांचे वाङ्मयावर नितांत प्रेम आहे. (हे वाङ्मय-प्रेम त्यांच्या रक्तातच असावे. कारण गेल्या पिढीतील प्रसिद्ध कादंबरीकार वि. . बरवे हे श्री. मधुकाका बरवे यांचे ज्येष्ठ बंधू होत.) आपल्या अध्यापन-कारकीर्दीत या उभयतांनी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात वाङ्मयाची अभिरुची निर्माण केलेली असणारच. त्यांच्या या वाङ्मयप्रेमापोटीच ती दोघे वाङ्मयक्षेत्रातील माझ्या छोट्या छोट्या हालचालींचे गेली कित्येक वर्षे निरपेक्ष कौतुक करीत आलेली आहेत. त्यांच्या त्या कौतुकाच्या शब्दांतून मला सतत निकोप प्रोत्साहन प्राप्त झालेले आहे; त्या उभयतांविषयी माझ्या मनात सदैव कृतज्ञतेचीच भावना आहे. म्हणूनच प्रस्तुत समीक्षाग्रंथ मी त्या उभयतांना विनम्रपणे अर्पण करीत आहे.

दत्तात्रय पुंडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि