60 140
Download Bookhungama App

पत्रकथी - बागेश्री देशमुख

Description:

ह्या पुस्तकात दोन कथांचा समावेश आहे.पहिली कथा मानसशास्त्रीय कथा आहे. दुसरी कथा नात्यांमधील गुंतागुंतीवर आधारित आहे. This book is set of two stories. First one is Psychological story.Second story is based on dynamics between human relationships.मनोगत कथा” हा मराठी साहित्यातील एक  महत्वाचा आकृतीबंध आहे. तसे पाहता लेखकाच्या मनात प्रत्येक विषय हा स्वतःचा आकृतिबंध घेऊनच जन्माला येतो असे मानले जाते. त्या आकृतीबंधाचे अन्य आकृतीबंधात रुपांतर करणे अशक्य नसते पण तसे करताना मूळ आकृतीबंधामधील अनुभवाची तीव्रता निश्चितपणे कमी  होते असे समीक्षकांचे मत आहे. बागेश्री देशमुख ह्यांच्या कथा – “कथा” ह्या आकृती बंधात सुद्धा स्वतःचा वेगळा आकृतिबंध तयार करू पहातात. त्या पत्राचा आकृतिबंध कथेच्या निरुपणा साठी करतात. मी जेंव्हा ह्या कथा वाचल्या तेंव्हा प्रथम ह्या पत्राच्या आकृतिबंधामुळेच त्यांच्याकडे आकर्षित झालो. ह्यात दोन दीर्घ कथा आम्ही सादर करीत आहोत. आणि ह्या पत्र-कथा संग्रहाचे समर्पक नाव आम्ही “पत्र-कथी” असे ठेवले आहे. पहिली कथा आहे “रंगुनी रंगात साऱ्या”.  वाचकांना “लेखक” किंवा “लेखिका” यांच्या बद्दल नेहमीच एक कुतुहूल मिश्रित आकर्षण वाटत आले आहे. लेखकाची कथा किंवा कादंबरी वाचत असताना वाचक त्याचे एक रूप...त्याचे व्यक्तिमत्व आपल्या मनात तयार करीत असतो आणि मग प्रत्यक्ष भेटीत आपली प्रतिमा प्रत्यक्ष व्यक्तीशी किती जुळते हे तो तपासत असतो. काही लेखक किंवा लेखिका जाणूनबुजून आपल्या भोवती एक धूसरता निर्माण करतात. हा खेळ कधी उलटा सुद्धा फिरू शकतो आणि लेखकाला वाचका बद्दल आकर्षण, उत्सुकता निर्माण होऊ शकते. काय होते अशा वेळी? ह्याचे खूप सुंदर आणि परखड चित्रण पहिल्या दीर्घ कथेमध्ये आहे. दुसरी कथा “नाते तुझे नि माझे” हि नात्यांच्या व्यामिश्रतेचे अत्यंत वास्तव चित्रण करते. कथा घडते अमेरिकेत स्थित असलेल्या मराठी कुटुंबात. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपापल्या वाटा वेगळ्या केलेल्या दोन व्यक्ती पुन्हा एकदा कर्मधर्म संयोगाने भेटतात...गत गोष्टींचा आढावा घेतात आणि पुन्हा एकदा एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपतात. मी नाते ह्या शब्दाची फोड नेहमीच करतो ...”ना” ते असलेले नाते. प्रत्येक वेळी नाते रक्ताचेच असले पाहिजे असे काहीच नसते. किंबहुना व्यावहारिक पातळीवर नसलेली नाती नेहमीच खूप अनोखा अनुभव देतात. बागेश्री देशमुख ह्यांची भाषाशैली अत्यंत ओघवती आहे आणि त्यामुळेच संपूर्ण कथा वाचून होई पर्यंत आपण तिच्या गुंतून राहतो. त्यातील अनुभव इतका गहिरा असतो कि कथा वाचून संपवल्यावर सुद्धा बऱ्याच वेळ ती आपल्या मनात रेंगाळत राहते. उत्तम साहित्याचे हे निदर्शकच नव्हे का? सृजन  


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि