60 140

पारो - भाग २ - गायत्री मुळे

Description:

एका सुसंस्कारीत घरातली मुलगी. आई, बाबा आणि ती असा त्रिकोण. काळजी, प्रेम आणि नि:स्वार्थ आयुष्य जगणारी. मैत्रिणीसोबत एका मुलाला भेटते. त्याच्या प्रेमात पडते. त्या प्रेमाच्या त्रिकोणात आईबाबांच्या प्रेमाचा त्रिकोण तुटतो. आणि उरतं फक्त शरीर वापरलं जाणारे, मारझोड होणारे, शोषले जाणारे.लेखिकेचे मनोगत बस एक जिस्म बन कर रह गया वजूद मेरा अंतर-घट की प्यास से तरबतर मेरी रूह पनाह मांगती है मेरे जर्रे-जर्रे से मैं खुद से टूटकर खुद को ढूंढती हूँ घर के हर कोने में कभी चाय की प्याली में कभी बिस्तर की सिलवटों पर या फिर अश्कों से तर तकियें में यहाँ जलता कुछ भी नहीं फिर ही मेरी रूह से धुआँ सा उठता है उसकी तपन से जिस्म झुलसता जाता है बनकर एक बूँद उस अगन में खोता हुआ अपना वजूद और भाप की तरह उड़ जाता है मेरी रूह की प्यास बस अपनी जगह कायम है... “पारो”चा दुसरा भाग तुमच्या सुपूर्द करताना एक अनाहूत मन:शांती आहे. तरी मनावर एक दडपण आहे. एका सुसंस्कारीत घरातली मुलगी. आई, बाबा आणि ती असा त्रिकोण. काळजी, प्रेम आणि नि:स्वार्थ आयुष्य जगणारी. मैत्रिणीसोबत एका मुलाला भेटते. त्याच्या प्रेमात पडते. त्या प्रेमाच्या त्रिकोणात आईबाबांच्या प्रेमाचा त्रिकोण तुटतो. आणि उरतं फक्त शरीर वापरलं जाणारे, मारझोड होणारे, शोषले जाणारे. सुडाने पेटलेली मैत्रीण आणि हलकट वृत्तीचा प्रियकर ह्या दोघांमधे तिचे आयुष्य पूर्ण बर्बाद होतं. तो तिला विकतो. आणि मग आयुष्य जातं ते हरियाणात. हरियाणात अशा विकत आणलेल्या मुली घरात वापरतात. त्यांना पारो किंवा मोलकी म्हणतात. ही विकत आणलेली मुलगी एका आयुष्यात तीन ते चार वेळा विकली जाते. तिला कुठलाही अधिकार नसतो. ती भारतीय जनगणनेत नसते. तिचे अस्तित्व पूर्णपणे नाम:शेष झालेले असते. ह्याला कारणीभूत कुणीही असू शकतं. घरातला वासनांध पुरुष, गरिबी किंवा अज्ञान. पण जी स्त्री पारो होते ती पूर्णपणे संपते. ती किती जगली, कशी जगली, जिवंत आहे की मेली ह्याची साधी चौकशी तिच्या नशीबी नसते. २५,००० गाव खाप पंचायतीच्या अधिपत्त्याखाली येतात. भारतीय कायदा न मानणारी खाप पंचायत. तिच्या ताकदीपुढे पारो ही यःकिश्चित असते. अशाच एका मुलीची ही व्यथा. मी माझ्या परीने बरेच काल्पनिक प्रसंग घालून मांडायचा प्रयत्न केला आहे. एक चुकीचा आणि आततायी निर्णय आयुष्य कसे बर्बाद करू शकतो हेच ह्या व्यथेतून कळतं. प्रत्येक वेळेस असेच होईल हे जरूरी नाहीच. प्रत्येक निर्णय चुकतोच असेही नाही. पण आयुष्य भिरकावले जाते. अस्तित्व संपते आणि उरतो फक्त अन्याय आणि शोषण. नाण्याला दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. प्रत्येक पाऊल वाईटाकडेच जाईल असे जरूरी नाही पण चांगलेच मिळेल असेही नाही. एका सत्शील आणि सुसंस्कारीत मुलीची पारोपर्यंतची वाटचाल, तिचा संघर्ष, तिची सहनशक्ती आणि मग शेवटी परत आपल्या गावात येणे आपले अस्तित्व निर्माण करणे आणि एक धडा जगासमोर ठेवणे... हा प्रयत्न मी ह्या व्यथेत केला आहे. पारो एक प्रथा आहे. जिची भयानकता ही कादंबरी वाचल्यावर लक्षात येते. ही कथा ह्यातील आणि ह्यातील पात्र पूर्णत: काल्पनिक आहेत. पारो ही कादंबरी वाचकांच्या सुपुर्द करताना मला काही व्यक्तींचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक वाटतं. डॉ. अमिता कुळकर्णी - ह्यांच्याकडून मला पारो प्रथेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांचे “पारो” ह्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्यासाठी महत्त्वाचे योगदान आहे. डॉ. अमिता कुळकर्णी ह्यांनी “पारो” सबंधी युनेस्कोला एक अभ्यास प्रबंध सुद्धा सादर केला आहे. मयुरा खरे ह्या माझ्या मैत्रिणीचा उल्लेख मी टाळू शकत नाही. वेळोवेळी हिने मला मदत केलेली आहे. विकीपेडीया, गुगल तसेच यू-ट्यूबला खाप पंचायत आणि पारोबद्दल भरपूर माहीती आहे. ‘न लिहिलेली पत्रे’च्या ऋणात मी सदैव असेल. - सौ. गायत्री मुळे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि