100 200
Download Bookhungama App

लुप्त - विक्रम भागवत

Description:

प्रथितयश नाटककार, एक शून्य शून्य, खाकी, चाळ नावाची वाचाळ वस्ती, आणि CID इत्यादी गाजलेल्या दूरदर्शन मालिकांचे लेखक विक्रम भागवत यांच्या मनात ३५ वर्ष घोळत राहिलेली. प्रकाशना पूर्वी सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेली कादंबरी : लुप्तआठवणी “लुप्त” ही माझी दुसरी कादंबरी वाचकांच्या हातात देताना आज खूप आठवणींनी मनात गर्दी केली आहे. १९८१ मध्ये ह्या कादंबरीची संकल्पना प्रभाकर पाध्ये (माझे दादा) ह्यांच्याशी गप्पा मारताना पुढे आली. त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे “लिही” हा एकच शब्द उच्चारला आणि तो पूर्ण व्हायला नंतर ३५ वर्षे जावी लागली. ह्या कादंबरीची मूळ मध्यवर्ती रेखा पुरुष होती...पण इतक्या वर्षात ती बदलून “स्त्री” झाली. हे असे का झाले?... ह्याचे उत्तर एका शब्दात किंवा वाक्यात देणे अशक्य आहे पण तरीही एक जाणवते की स्वत्वाचा शोध घेणारी स्त्री मला सतत खुणावत रहाते आणि तिचा शोध मी घेत रहातो. ही कादंबरी पूर्ण होण्यात एका व्यक्तीचा खूप मोठ्ठा सहभाग आहे... आणि ती व्यक्ती म्हणजे अरुंधती देवस्थळी. ह्या कादंबरीच्या संपादिका. त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट नाही. आमची ओळख आणि मैत्री फेसबुकवर झाली. मी “न लिहिलेली पत्रे” हे पेज चालवतो. त्याच्या सुरुवातीच्या काळातील त्या आवर्जून वाचक होत्या. मग मी त्यांना एकदा सहज सांगितले “लुप्त” विषयी आणि त्यांनी जे लिहिले आहे ते पाठवायला सांगितले. खरे तर त्या अत्यंत व्यस्त असतात. शीतला(उत्तराखंड) इथली संस्था... त्यांची स्वतःची पुस्तके प्रकाशित करणारी संस्था आणि त्यांचे कामानिमित्त सतत फिरणे देशात आणि विदेशात. तरीही त्यांनी अत्यंत आत्मियतेने संपादनाची जबाबदारी स्वीकारली. प्रसंगी प्रेमाने, प्रसंगी कठोरपणे (जे त्यांना सहज जमत नाही) माझ्याकडून कादंबरीवर संस्कार करून घेतले. आज ज्या स्वरूपात “लुप्त” तुमच्यासमोर येत आहे... त्याचे श्रेय खूप मोठ्ठ्या प्रमाणात अरुंधती देवस्थळी ह्यांचे आहे. चंद्रकांत मेहेंदळे आणि जयंत पोंक्षे ह्यांचा उल्लेख केल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही... कारण प्रत्येक प्रकरण वाचणे... मग वाघबकरीमध्ये चहा प्यायला भेटणे... नुसतेच माझ्याकडे पाहात रहाणे... प्रसंगी चार कौतुकाचे शब्द बोलणे, प्रोत्साहन देणे... हे खूप महत्त्वाचे काम दोघांनी केले आहे. “लुप्त” च्या मुखपृष्ठावर भवती न भवती चर्चा झाली. अरुंधती देवस्थळी ह्यांच्या मनात त्याची संकल्पना बऱ्याच प्रमाणात होती. शेवटी त्यांनी मला सामचा चेहरा मुखपृष्ठावर असावा असे सुचवले. अर्थात त्यांनी हे फक्त सुचवले असेच नाही तर एक नाव सुद्धा सुचवले मुक्ता कांपलिकर. मी मुक्ताचे अनेक फोटो पाहिले...पण एका फोटोपाशी मी थबकलो... आणि आतून एक प्रतिक्रिया उमटली... “हा सामचा चेहरा आहे.” तिने कुठलेही आढेवेढे न घेता परवानगी दिली. जयंत भीमसेन जोशी ह्यांनी हा फोटो काढला आहे... आणि त्यांनी सुद्धा खूप उत्साहाने मला तो वापरायची परवानगी दिली. मी दोघांचा ऋणी आहे. सृजन ड्रीम्स आणि बुकहंगामा.कॉम ही माझीच अपत्ये आहेत आणि त्यांच्यातर्फे ही कादंबरी प्रकाशित होणे साहजिकच होते. मी छापील पुस्तकांच्या विरोधात नाही... पण मला डिजिटल प्रकाशन सोयीचे आणि सुटसुटीत वाटते. म्हणूनच “लुप्त” तुमच्या हाती डिजिटल स्वरूपात येते आहे. त्याचवेळी कॅथरीन डन ह्यांच्या सहकाऱ्याने ती ६५ डिजिटल स्टोअर्स मध्ये सुद्धा आज उपलब्ध होत आहे. त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार. कादंबरीचा ले-आउट श्री गिरीश जोशी यांच्या साथीदार प्रिंटर्सने केला आहे... ते माझे हक्काचे आहेत... गिरीश आणि त्यांची पत्नी स्वाती ह्यांचे आभार मानायचे नाहीत तर आठवण ठेवायची आहे. ह्या कादंबरीच्या मार्केटिंगची जबाबदारी डीजिवाले ह्या संस्थेचे सोहम सबनीस ह्यांनी घेतली आहे. सोहम हा तरुण आणि कल्पनातीत उत्साही तरुण मला सतत तरुण ठेवत असतो. “लुप्त”च्या प्रवासात अनेक व्यक्ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी होत्या... सर्वांचा उल्लेख करणे केवळ अशक्य. तरीही सर्वांची आठवण मनात आहे हे विसरू नका. - विक्रम भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि