Id SKU Name Cover Mp3
Kaya Mhntaa? Balala Bra Nahi?


30.00 58.00
Download Bookhungama App

काय म्हणता? बाळाला बरं नाही? - डॉ. गो. अ. ताम्हनकर

Description:

काय म्हणता? बाळाला बरं नाही? - ले. डॉ. गो. अ. ताम्हनकर 

 काय म्हणतां? बाळाला बरं नाही?” या शीर्षकाखालीस्त्रीमासिकांत प्रसिद्ध झालेल्या बालरोगविषयक माझ्या लेखमालेत थोडीशी भर घालून हे पुस्तक वाचकांच्या व विशेषतः वाचक-भगिनींच्या हाती देतांना मला आनंद होत आहे. अर्थात् या माझ्या द्वितीय वाङ्मय- अपत्याची आरोग्यसंपन्नता वाचक बंधु- भगिनींनी ठरवावयाची आहे.

बाळाला जन्म देण्याच्या कामी आई व बाप हे उभयता जरी सारखेच कारणीभूत असले व बाळाच्या नावापुढे बापाचे नाव लावण्याची जरी वहिवाट असली तरी गर्भधारणेपासून तो बाळ मोठे होईपर्यंत मातेलाच सर्व खस्ता खाव्या लागतात. बालसंगोपन तिच्या हातूनच व्हावयाचे असते, म्हणून प्रत्येक मातेला बाळाच्या पालनपोषणासंबंधी व सामान्य बालरोगांविषयी ठोकळ माहिती असणे उपयुक्त आहे. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग न होऊ देणेच अधिक शहाणपणाचे असल्याने या पुस्तकात रोगांचा संसर्ग नि प्रसार कसा होतो आणि रोग न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय कोणते योजावे यांचेच विवेचन विशेष भर देऊन केलेले आहे. यानिमित्त क्वचित् झालेल्या द्विरुक्तीची वाचकांनी क्षमा करावी.

बालकांना आपल्या भावना बोलून दाखविता येत नसल्याने रडणे, झोपणे, खाणेपिणे इत्यादीवरून मातेला बालरोगांचा अंदाज बांधावा लागतो. अलीकडील विभक्त कुटुंबांतील राजाराणीच्या छोट्या संसारात वडील अनुभविक मंडळींच्या अभावी स्वयंपाकाप्रमाणे बालसंगोपनांतही जे बरेवाईट प्रयोग अज्ञपणे चालू असतात त्यांच्यामुळेतुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातोअसे मनांत म्हणण्याची बालकावर पाळी येते! तेव्हा अशा तरुण भगिनींना या पुस्तकाची विशेष मदत होईल असा अंदाज आहे.

बालरोगाचे निदान व चिकित्सा करण्याच्या कामी डॉक्टरची मदत विशेष उपयुक्त असते हे खरे; परंतु सर्वच वेळी नि विशेषतः खेडोपाडी ती खास उपलब्ध होतेच असे नसल्याने या पुस्तकात दिलेली रोगलक्षणे व साध्या उपाययोजना प्रसंगी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास वाटतो.

गृहभूषणानि बालकानिहे वचन अगदी सत्य आहे. पण केव्हा? ती सुदृढ, आकर्षक आणि आरोग्यसंपन्न असतील तेव्हा! नाहीपेक्षा हीच बालकानिगृहदूषणानिठरण्याची भीती!! कुटुंबनियोजनांत प्रत्येक जोडप्याला फार तर तीनचारच मुले असणे इष्ट ठरते; पण ती तीनचारच चांगली आरोग्यसंपन्न ठरली तर बरे; नाहीतर कुटुंबाचा नि देशाचाहि घात व्हावयाचा! तेव्हा निरोगी प्रजा तयार करून कुटुंबनियोजन यशस्वी करण्यास हे पुस्तक योग्य वेळी आमच्या देशभगिनींना हातभार लावील अशी आशा आहे.

बाल्यावस्था हा आयुष्याचा पाया असून या वेळी जडलेल्या काही रोगांचे परिणाम जन्मभर भोगावे लागतात व अल्पायुष्य वाट्याला येण्याची भीती असते. आपल्या भारतात आयुष्याची मर्यादा फारच कमी असून बालमृत्युचे प्रमाण तर भयंकरच आहे. अर्थात् ही शोचनीय स्थिति सुधारण्याच्या कामी या पुस्तकाचा उपयोग वाचकांनी अवश्य करावा अशी शिफारस आहे.

सदरहू पुस्तक मुख्यतः सर्वसाधारण वाचकांसाठी लिहिले असल्याने त्याची भाषा, सखोलपणा, पूर्णत्व वगैरेकडे सहानुभूतीने पाहून तज्ज्ञ बंधु-भगिनींनी टीकेचा मोह आवरावा अशी विनंती आहे.

शेवटी या शास्त्रीय विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन चालू मंदीच्या काळातहि हाती घेण्यात किर्लोस्कर प्रेसने जी धडाडी व समाजसेवेची तळमळ व्यक्त केली आहे त्याबद्दल मी त्याच्या चालकांचा फार आभारी आहे.

 

गो. . ताम्हनकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि