Id SKU Name Cover Mp3
Karsanket


40.00 96.00
Download Bookhungama App

करसंकेत - श्री. द. दा. पानसे & सौ. विभावरी शिव पंजाबी

Description:

ह्या ग्रंथात हस्तसामुद्रिक शास्त्राची ओळख ह्या शास्त्राचे विविध उपयोग, हस्तलक्षण आणि हस्तरेषा शास्त्र, हातावरील विविध प्रकारची चिन्हे, खुणा . बाबींचा समावेश केलेला नाही. थोडक्यातहस्तसामुद्रिक संहिताया महान ग्रंथास सदरहू ग्रंथ पूरक म्हणून उपयोगी पडावा अशा प्रकारची मांडणी ह्या ग्रंथाने केलेली आहे.हात कसा पाहावाहा आमचा पहिला ग्रंथ वाचकांपुढे ठेवताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रावर एखादा ग्रंथ लिहून ह्या महान शास्त्राची थोडीबहुत सेवा करावी असा आमचा मानस बरेच दिवसांपासूनच होता. नुकतीच एक सुवर्णसंधी आमच्यापुढे चालून आली व तिचा उपयोग आम्ही पुरेपूर करून घेतला. हस्तसामुद्रिक तज्ज्ञ डॉ. एम. कटककर यांनी महान परिश्रम घेऊन आपला ‘encyclopedia of palm and palm-reading’ हा इंग्रजी ग्रंथ १९८५ मध्ये प्रसिद्ध केला. ह्या पुस्तकाचे मराठी भाषेमध्ये भाषांतर होऊन तो ग्रंथ महाराष्ट्रातील ह्या शास्त्राच्या प्रेमींना उपलब्ध करून द्यावा, अशी डॉ. कटककरांची फार दिवसांची मनीषा होती. त्यासंबंधी आम्हास विचारणा झाली व आम्हीही चटकन होकार दिला. सदरहू ग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे काम आम्ही जिद्दीने पुरे केले आणि हा महान ग्रंथहस्तसामुद्रिकसंहिता अर्थात समग्र करदर्शनह्या नावाने प्रकाशात आला. आमचा उत्साह द्विगुणित झाला आणि याच वेळी डॉ. कटककर यांच्याकडून एक सूचना करण्यात आली की, ‘हात कसा पाहावाह्या विषयावर ग्रंथनिर्मिती करावी की जेणे करून त्यामुळे हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना, तसेच ह्या शास्त्राचा व्यवसाय करणाऱ्यांना मार्गदर्शन होऊ शकेल.

पुण्याच्या भालचंद्र ज्योर्तिविद्यालयामध्ये हस्तसामुद्रिक विषयाचे अध्यापन करताना असे दिसून आले की, दिवसेंदिवस ह्या शास्त्राकडे सुशिक्षित वर्ग बहुसंख्येने आकर्षित होत आहे. हे शास्त्र काय आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ह्या विद्यालयामध्ये ह्या शास्त्रावरील अध्यापनाचे कार्य गेली आठ वर्षे सतत होत असून बरेच विद्यार्थीहस्तसामुद्रिक विशारदही पदविका प्राप्त करून बाहेर पडलेले आहेत. काही जण हस्तसामुद्रिक शास्त्राचा व्यवसाय करीत असून त्यांच्याकडून वरचेवर मार्गदर्शनासाठी पृच्छा होत आहे. ‘हस्तसामुद्रिक विशारदह्या पदविकेसाठी जी विषयसूची निर्माण केली होती, त्यामध्ये ह्या शास्त्राच्या हस्तलक्षण शास्त्र व हस्तरेषा शास्त्र ह्या विभागांवरच प्रामुख्याने भर दिलेला होता. त्याचा उद्देश असा की, हे शास्त्र काय आहे हे समाजास माहिती व्हावे. परंतु गेल्या दोन वर्षामध्ये ह्या विषय सूचीमध्ये आणखी भर घालून हाताच्या ठशाचे विवेचन करून त्यावरून व्यक्तीचे मनोविश्लेषण तसेच तिच्या आयुष्यात आगामी कालात घडणाऱ्या घटनांचा मागोवा कसा घ्यावा ह्यासंबंधीचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक नवीन दृष्टी निर्माण झाली आणि त्यामुळेच हात कसा पाहावा ह्यासंबंधीचे मार्गदर्शन होणे ही बाब आवश्यक वाटू लागली.

हस्तसामुद्रिक शास्त्रावर गेल्या दोनशे वर्षात पाश्चिमात्य व पौर्वात्य विचारवंतांनी विपुल ग्रंथलेखन केलेले आहे. काही ग्रंथकर्त्यानी आपल्या ग्रंथामध्येहात कसा पाहावाह्यासंबंधीची उपयुक्त माहितीही दिलेली आहे. या शास्त्रावरील बरेचसे संशोधन पाश्चिमात्य देशांतच झालेले असल्यामुळे ग्रंथनिर्मिती सुद्धा इंग्रजी भाषेतच झालेली आहे. आपल्या भारतामध्ये मात्र गेल्या ५० वर्षात ह्या शास्त्रामध्ये संशोधन होऊन ग्रंथनिर्मितीही झालेली आहे. पण ती सुद्धा इंग्रजी भाषेतच. मात्र काही विचारवंतांनी मराठी भाषेमध्ये लेखन केलेले आहे व त्यामध्ये हात कसा पाहावा ह्यासंबंधीचे थोडेबहुत मार्गदर्शनही केलेले आहे. पण ते बरेचसे पुराणातील ग्रंथांवर अवलंबित असून प्रचलित काळामध्ये तितकेसे उपयोगी पडणारे नाही. हे शास्त्र जनसामान्यांच्या प्रश्नांची उकल करून कसे मार्गदर्शक ठरू शकेल यासाठी काही मराठी प्रज्ञावंतांनी जरूर प्रयत्न केलेले आहेत. पण हात कसा पाहावा ह्यासंबंधीचे शास्त्रशुद्ध आणि सविस्तर विवेचन करणारा स्वतंत्र ग्रंथ मराठी भाषेमध्ये आजमितीस तरी उपलब्ध नाही. ही उणीव काही अंशाने भरून निघावी व ह्या शास्त्राच्या उपासकांना आपले कार्य शास्त्रशुद्ध रीतीने करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे ह्या दृष्टिकोणातून सदरहू ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

 

हा ग्रंथ लिहिताना वाचकांना हस्तसामुद्रिक शास्त्राचे संपूर्ण ज्ञान आहे अशी अपेक्षा केलेली आहे. किंबहुना त्याने वरील ग्रंथाचा सखोल अभ्यास केलेला आहे ही गोष्ट गृहीत धरलेली आहे. त्यामुळे ह्या ग्रंथात हस्तसामुद्रिक शास्त्राची ओळख ह्या शास्त्राचे विविध उपयोग, हस्तलक्षण आणि हस्तरेषा शास्त्र, हातावरील विविध प्रकारची चिन्हे, खुणा इ. बाबींचा समावेश केलेला नाही. थोडक्यातहस्तसामुद्रिक संहिताया महान ग्रंथास सदरहू ग्रंथ पूरक म्हणून उपयोगी पडावा अशा प्रकारची मांडणी ह्या ग्रंथाने केलेली आहे. तथापि हाताचे निरीक्षण करण्यासंबंधीची चर्चा करताना आवश्यक तेथे संदर्भासाठी थोडीबहुत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच हा ग्रंथ लिहिताना पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारवंतांनी हात कसा पाहावा त्यासंबंधी त्यांच्या ग्रंथातून केलेल्या सूचनांचा विचार करून त्यात आम्हास आलेल्या प्रत्यक्ष अनुभवाची जोड दिलेली आहे. नियमावली व इतर सूचना करताना ह्या शास्त्राची शास्त्रीय बैठक विचारात घेतलेली आहे. हाताच्या ठशांची निवड करताना ह्यात सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश केला असल्यामुळे वाचकांना त्याचा पडताळा त्यांच्या दैनंदिन जीवनात, त्यांच्या व्यवसायात आवश्य यावा असे आम्हास वाटते. ग्रंथाचे लिखाण करताना आम्ही दोघांनी विषयांची वाटणी करून घेतल्यामुळे दोघांच्याही सखोलज्ञानाचा अनुभव ह्या ग्रंथरूपाने एकत्रित करता आला आहे. आणि त्याचा वाचकांना चांगला उपयोग होईल अशी आशा वाटते.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि