Default welcome msg!

9 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. कुपी

  कुपी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  Publishing Soon

  सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे ‘कुपी’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. ‘लोकमत’च्या ‘मंथन’ या रविवार पुरवणीत ‘कुपी’ या सदराचे लेखन डॉ. मुजुमदार यांनी केले. त्यांच्या या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असे त्यांनी सुचविले ही त्यांच्या मनाची श्रीमंती आहे. माझ्यावर ही जबाबदारी सोपवून डॉ. मुजुमदार यांनी माझा गौरव केला असे मी मानतो. मुजुमदार यांची शिक्षणक्षेत्रातील कर्तबगारी जगविख्यात आहे. इंदिरा गांधी यांच्यासारख्या ऐतिहासिक नेत्यापासून मॉरिशसच्या सखाराम यांच्यापर्यंतचा सहवास शब्दांत बांधावा असे त्यांना वाटले.

 2. गीत ये न ते जुळून

  गीत ये न ते जुळून

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  अमेरिकेत वास्तव्य असलेले डॉ सुनील अणावकर आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून लेखन करतात. त्यांच्या कथा विविध मासिके / पत्रिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या "मीनाकुमारीच्या शोधात" या कथासंग्रहाबरोबरच त्यांचे "गीत ये ते ने जुळुनी" हे दोन अंकी मराठी नाटक आम्ही प्रकाशित करीत आहोत.. या नाटकाची कल्पना ए.आर. गर्नी यांच्या "लव लेटर्स " आणि जावेद सिद्दिकी यांच्या "तुम्हारी अमृता" या दोन नाटकांपासून सुचली आहे.

 3. दूध आणि दुधाचे विविध पदार्थ

  दूध आणि दुधाचे विविध पदार्थ

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  Publishing Soon

  दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कसे करता येईल व त्याचा उपयोग शेतकरी वर्गास/दुध उत्पादकांस, कसा करता येईल याचा सांगोपांग विचार करून लेखकांनी दूध आणि दुधाचे विविध पदार्थ हे पुस्तक साध्या, सोप्या भाषेत लिहिलेले आहे. या पुस्तकात उपलब्ध करून दिलेली माहिती शेतकरी, दूध उत्पादक, दुग्धजन्य पदार्थ निर्मितिकारास, सहकारी दूध संस्था, विद्यार्थी, शिक्षक तसेच संशोधकांस निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे.

 4. देवमासा

  देवमासा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  Publishing Soon

  देवमासे हे नाव जरा गोंधळात टाकणारे आहे. नावावरून आपली समजूत होते की देवमासे म्हणजे माशांचा एक प्रकार. दुसरे म्हणजे ते पाण्याखाली राहतात. परंतु देवमासा हा तुमच्या आमच्यासारखा एक सस्तन प्राणी आहे. त्यांना हातपाय नाहीत. परंतु शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की फार पूर्वी देवमाशाचे पूर्वज जमिनीवर वास्तव्य करत होते.

 5. बंडू

  बंडू

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs40

  Publishing Soon

  गंगाधर गाडगीळ लिखित विनोदी कथा

 6. मीनाकुमारीच्या शोधात

  मीनाकुमारीच्या शोधात

  Regular Price: Rs68

  Special Price: Rs30

  अमेरिकेत वास्तव्य असलेले डॉ सुनील अणावकर आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून लेखन करतात. त्यांच्या कथा विविध मासिके / पत्रिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या "मीनाकुमारीच्या शोधात"या कथासंग्रहातील कथा अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनोव्यथा उलगडून दाखवितात. या कथासंग्रहा सोबतच त्यांचे दोन अंकी नाटक "गीत ये न ते जुळून" आपणासाठी सादर करिताना सृजन परिवारास खूप आनंद होत आहे. आपण या दोन्ही पुस्तकांचे स्वागत कराल हि खात्री आहेच.

 7. रामभरोसे

  रामभरोसे

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  गोपाळ बनहट्टी यांचे तीन अंकी विनोदी नाटक

 8. लघुतम कथासंग्रह

  लघुतम कथासंग्रह

  Regular Price: Rs60

  Special Price: Rs30

  Publishing Soon

  त्याच्या जाण्यानं आधी गेलेले नव्यानं परतत होते. एका माणसाच्या आप्ताच्या आठवणीतून दुसऱ्याच्या आठवणीत तो सहज प्रवेशत होता. गुंतत होता. सुटून दुसऱ्याकडेही जात होता. जणू हे गेलेले सगळे आप्त होते. नाळेसारखे त्यांना जोडणारे नाते होते. मृत्यूचे नाते. कठड्यावर अंगठ्यानं पकड ठेवत त्याची बोट हलत होती. मृत्यू. जे सगळे मेलेत ते अज्ञात स्थळी कदाचित सगळेच एकत्र असतील. मी बाजूला पडलोय. एकटा आहे. परिचित मृत एकत्र असण्याच्या कल्पनेनं त्याची एकटेपणाची भावना प्रबळ झाली. “एकटा येतो. एकटा जातो. मित्र गेला तसा. खरोखर माणूस एकटाच जातो–”

 9. सर्वांसाठी पाळीव प्राणी

  सर्वांसाठी पाळीव प्राणी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  प्रत्येक प्राण्याबद्दल सविस्तर माहिती असलेली अनेक पुस्तके सध्या मिळतात. त्यातली महत्त्वाची माहिती शेतकऱ्याला एकत्रपणे मिळावी हे या पुस्तकाचे प्रयोजन. हे विविध प्राणी पाळताना - त्यांची रोजची देखभाल करतांना ‘प्राणी असे वागतात’ या प्रकरणाचा उपयोग होईल असा विश्वास वाटतो.

9 Item(s)

per page