Default welcome msg!

संस्कार सोहळे

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

संस्कार सोहळे

व्यक्तीच्या जन्मापूर्वी तीन, जन्मानंतरच्या शैशवकाळात सहा आणि उपनयनापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत सात असे सोळा संस्कार सांगण्यात आले आहेत. यापैकी चार संस्कार थोड्या फार प्रमाणात प्रचारात आहेत. वैदिक मंत्र, काही विधी व काही नंतरच्या काळात दोहोंमध्ये पडलेली भर असे या संस्काराचे स्वरूप दिसते.

संस्कार संस्कृतात असल्याने पुरोहितांवाचून सामान्यांना ते कळण्यात अडचण येते. पुरोहित सर्वत्र उपलब्ध नसल्याने प्रसंगी लोकांनी आपापल्या बोली भाषेतही संस्कार करण्यास आरंभ केला. शहरी, शिक्षितांपेक्षा आडगावी राहणाऱ्या अडाणी, वनवासी बांधवांनी हा स्वावलंबनाचा मार्ग पत्करलेला दिसतो. ठाणे जिल्ह्यातील वारळी समाज त्यांच्या बोलीतच विवाहासारखे संस्कार करताना दिसतो. लग्न लावण्यास स्त्रीच असते. तिला ‘ धवळेरी ’ म्हणतात. प्रसंगी ती विधवा असली तरी तिचा हा अधिकार कोणी हिरावून घेत नाही. कोठल्याही पोथीवाचून, पुरोहित पंडिताच्या प्रवचनावाचून वारल्यांचे विवाह पार पडतात. स्थळकाळपरत्वे वारली विधीत भर टाकणारी स्त्री जी प्रत्युत्पन्न-मतित्व दाखवते ते शिक्षित, शहरी स्त्रीने मंगलाष्टके रचण्यामध्येच काय ते दाखवले आहे.

सुशिक्षित शहरी उच्चवर्गीयांमध्ये लग्नप्रसंगी कोणते मंत्र म्हणण्यात येतात, कोणते विधी व का करण्यात येतात या संबंधी जिज्ञासा क्वचितच कोणी दाखवत असेल. अशिक्षित, अर्धशिक्षित, ग्रामीण समाजातील स्त्रिया या पारंपारिक गीते म्हणून संस्कारात सहभागी होतात व प्रसंगी त्यांना समजणारा भाव अन् अर्थ आपापल्या शब्दात गुंफून रचना करतात ती पुष्कळदा मोठी हृदयंगम असते. शहरी सुशिक्षितांमध्ये क्वचितच दिसणारी ही सर्जनशीलता श्रीमती कमलिनी काटदरे यांनी ‘ संस्कार सोहाळे ’ या त्यांच्या पुस्तकात संस्कारविधींचे वर्णन करतांना प्रकट केली आहे. म्हणून विशेष आनंद होतो. जन्मापासूनच्या पारंपारिक प्रथा व संस्कारमधील ग्राह्यांशांची, बुद्धीस पटणारी व भावनांना स्पर्शून जाणारी नोंदणी या पुस्तकात कमलिनीताईंनी केली आहे.

- प्रास्ताविक (य. शं. लेले)



माझं मनोगत



ला वाटतं सोहाळे-समारंभ, सण उत्सव संस्कारांना उजाळा देतात. उत्साहाला उधाण येतं. आनंद शब्दरुप घेतात व नकळत त्याला गेयना प्राप्त होते. प्रास, अनुप्रास, ताल, यमक अशा नियमांची आडकाठी रहात नाही. शब्द ओतले जातात. ओवीबद्ध होतात.


ओवी म्हणजे आजी पणजीच्या ओठांतून वात्सल्य भावनेच्या स्त्रोतांतून पसरवलेली एक काव्यसंपदा. तसं पाहिलं तर ओवीचा उगम ११२९ पर्यंत मागे जातो. झुंजूमुंजू होतय नाही तोच खेड्यापाड्यात, झोपड्या-झोपड्यांतून जात्यावर दळणाला ओव्यांचा सूर लागतो. रविकिरणांचं स्वागत होतं. -


उगवला नारायण, लाल शेंदराचा खापा
फुले अंगणात चाफा, सखे गडे राधिका ॥१॥
सकाळीच्या पारी चल अंगण लोटू दोघी
माझ्या दारामध्ये सूर्व्या, पावणा आला बिगी॥२॥
मोर मुगुट माथा, गला हायती वनमाळा
चल स्मरुया सावळा, गोकुळीचा॥३॥


जात्यांवर आम्ही जिजाईंची, तुकारामाच्या आवडींची ओवीनी ओवी म्हणतो नव्हं का. ’’ ओव्या सांगताना रमलेली रखमा लगेच म्हणायलाही लागली -


तुकाराम बोलती जिजाईला, “ चल माझ्यासंगे वैकुंठाला,
घे गं हातामध्ये टाळ, नाहीत कोणाचं लेकबाळं
घे गं हातामध्ये वीणा, नाहीत कोणाच्या लेकीसुना
चलं माझ्या तू बरोबरी, आलं विमानं दारियाला, ’’
जिजा बघती वाकुनीया, अनमान राखुनीया,
येते म्हणे नव्हं कां, काम राहिलं हातामंदी,
जिजा बोलती ‘ हळदी कुंकवाच जहाजं बुडालं दरियामंदी.... ’
ओवीतले शब्द हृदयस्पर्श वाटले. रखमाचं डोळे लगेच भरून आले, माझेपण.
“ केळीच, आजी, ऐका, हे गुपित -
जन्मामधे जन्म केळीबाईचा चांगला।
भ्रतारावाचूनी गर्भ नारीला राहिला॥
श्रेष्ठ पतिव्रता, केळीबाई म्हणू त्याला।
विनागर्भ भोग, मरणाचा गं सोहळा॥ ”
कधी नव्हे ते केळीच गुपित कळलं. रखमाला कसं माहित होतं देव जाणे.
अंगणात तुळशीला पाणी घालणारी सुवासिनी
पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम,
तुळशीखाली राग, पोथी वाचे.
व्रतनेमधर्मात ओव्यानीच सुरुवात व ओव्यांची माळा गुंफत तुळशीची पूजा।
नातवाची वाट पहाणाऱ्या आजी सूनबाईला म्हणतात,
नातू नहातो पायावर काशीयात्रेचं मिळे फळं
धन्य केलस सुनबाई, फुलवलीस वंशवेलं॥
मुलगी झाली तरी सासूबाई नाराज नव्हत्या, नात झाली म्हणून खुषीतच-
लेक काय तो परीस, लेक काय ती ऊणी।
हिरा नव्हे हिरकणी, किर्तीबाई॥


आपल्या आजी पणजी उत्सवप्रसंगी अशा भारावून जात असत. कामाची सांगड घालताना पेन्सील हातात धरायला वेळ कुठला ? मनात शब्द घोळत रहात भावरस त्यात मिसळून जाई. अंतःकरण हेलावणाऱ्या भावपूर्ण ओव्या, पणजीकडून आजीकडे, आजीकडून आईकडे अशा मुखोद्गतच होऊन राहायच्या.
काळ पुढे सरकत असला तरी संस्काराची मुळं तिथं रुजून राहीली. बारशापासून काय, मुलगी गर्भवती झाल्याचं कळलं की आई-वडिलांचा आनंद अनावर होतो.
केळ दारीची गाभणं, लाजेनं लबलेली
नका करु आवाजं, उद्या लगडेलं केळफूलं॥
केळ वाहते तो भार, कोण तिला सावरतो ?
ओटीत ओझं म्हणूनी, भार बाईला का होतो ?॥


(आजीजवळ ओवी तयारच असते.) तो आनंद मुलामुलींच्या लग्नापर्यंत ओवी गीतातून प्रगट होत असतो. आपली संस्कृती, संस्कार-विधीतून आपण पुढच्या पिढीला पोचवत असतो. लग्नकार्याच्या पद्धती सोयी-सवडीप्रमाणे वळण घेत असल्या तरी आवश्यक ते धार्मिकविधी करण्याकडे नकळत आपण कल दाखवतो. पद्धती अंशतः तरी पाळाव्यात म्हणून थोडं धर्माचरण, पूजार्चा, कर्मकांड, काही अंधश्रद्धेनं म्हणा आम्ही जोपासल्या. स्त्रियांनीच धर्मनीती टिकवली असं श्रेय घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर रुढीपरंपरा पाळताना ही प्रसंगानुरुप म्हटली गेलेली गीतं, साजेश्या ह्या ओव्या त्यांनीच जतन केल्या.


साग्रसंगीत लग्न करायच म्हटलं की, आमच्या मुलींना, (वरमाई अगर वधूमाई होताना.) घाणा भरण्यापासून सारं करावसं वाटतं. घाणा भरण्याच्या ओव्या म्हणायला आजी, काकी निदान तिची मावशी लागते. ती जुनी गाणी म्हटली जावी असं वाटतं. महाराष्ट्रातूनच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पंजाबी, गुजराती, बंगाली, तामीळ, मल्याळी ह्यांची पण सोहाळे-संगीताची संपदा मोठी आहे. भाषा भिन्न असली तरी मनं एक आहेत. जेथे मंत्र नाहीत तेथे विधीच्या जोडीला गाणी म्हणण्याची प्रथा फार प्राचीन, वेदपूर्वकालीन आहे. असं म्हणतात थोड्याफार फरकाने आजही त्यांची पद्धती पाळल्या जातात. भावपूर्ण ओव्यागीतांचा तसाच सूर लागतो.


वाल्मीकी रामायणांत रामाजन्माच्यावेळी गंधर्वाची गाणी आणि अप्सरांचे नृत्य या संबधीची वर्णने आढळतात. संस्कृतची प्रसिद्ध कवयित्री ‘ विज्जिका ’ हिने म्हटलय, जेव्हा स्त्रिया साळी कांडतात तेव्हा गाणी म्हणतात. मुसळाच्या वरखाली होण्याबरोबरचा ठेका, त्यांच्या बांगड्यांचा नाद, गीतांचे स्वर यांचा सुरेख संगम होतो. तसच स्त्रियांची जात्यावरची गाणी गहू सातू अगर इतर धान्याचा दळत असल्याचा वास रस्त्यावरील पथिकाला क्षणभर खिळवून ठेवतो.


नागपंचमीच्या पूजेच्या वेळची गाणी “ चल गं सखे वारूळाला, नागोबाला पूजायला - पूजाऽऽयाऽऽला ” कानाला कशी गोड लागतात. भुलाबाई, हयगा, खानदेशातली कानूबाईच्या पूजेच्या वेळची गाणी सणाचं महत्त्व जाता जाता सांगतात. ही गाणी काय वा ओव्या, लग्नात वरवधूला हळद लावताना, रुखवत वाजत नेताना, गौरीहराशी आंबा शिंपताना, सगळी ओवीछंदत, गेय स्वरुपाची, कार्याला आगळं चैतन्य देतात. ‘ उत्साह, आनंद सूर धरून असतो, वहात रहातो.


ती लग्नाची गाणी, त्या ओव्या, त्याच वेळेस का व कशा गुंफल्या गेल्या ? त्यातूनच संस्काराची ओळख व शिकवण कशी सहज मिळत राहतीय ? ओव्यामागची संयोजकता समजावून घ्यावी अस मनात यायला लागलं. त्याचा मागोवा घेताना, सर्वांनाच थोडं काही मिळावं म्हणून हा प्रपंच मांडायला सुरुवात केली. मी केलेल्या ओव्या अशाच वेळोवेळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आहेत. त्या ओवीमागून ओवी लिहून काढण्यापेक्षा, त्या प्रसंगापात ऊसळणाऱ्या भावना त्या त्या वेळच्या रुढ पद्धतींची कारणमीमांसा, परंपरेची माहिती देत, घरच्याच कार्यात मांडवात मिरवणारी मी चोखंदळपणे, चौकसनजरेने सारं पहात असताना, तुम्हाला सारं सांगावं म्हणून मधून मधून मीच बोलतीय व असं निवेदन ऐकत, माझ्याशी हसत बोलत, सुशिक्षित गृहिणींना वाचायला आवडेल, वेळप्रसंगी ओव्या-गीतं सुरात म्हणताही येतील.


मातृत्व लाभल्याचा आनंद मलाही झाला. त्या आनंदाची भुलावणं बाळाचा पापा घेताना होई. जगाचा विसर पडे. बाळाला न्हाऊ-माखू घालताना, नीट काजळं करताना, काऊचिऊचे घास भरवताना - जे सगळं ओवीच्या सुरात सुरू होई, ते अंगाईगीत म्हणून झाल्यानंतरच माझी तंद्री उतरत असे.


ईच्या वात्सल्याला भरती येते. ती थोडीच मुलाची वेगळी अन् मुलीची वेगळी असते ? प्रेमपान्हा तसाच फुटतो. आई मुलीलाही त्याच मायेनं आंदोलते. प्रेमानं डोलवते ओव्या-गीत गुणगुणतच.


आजी-आजोबा  असावेत मग कौतुकाला विचारायला नको. साऱ्या घराच्या आनंदाला पारावार रहात नाही. मग अगदी शांतिपाठ, पाचवी, सहावीची पूजा होते. वेडगळ रुढी म्हणून आता आई डावलत नाही. अर्थ समजून घेतला की विधीच्या मांगल्याचं महत्त्व पटतं. अशुभाची पाल मनी वसायला नको म्हणून प्रथम दृष्टी उतरावयाला फूल, तांदूळाचे दाणे, नंतर मीठमोहऱ्या ऊतरून ‘ नको बाई दृष्ट आलिया गेल्याची, पापी चांडाळाची, दृष्ट झाडाची माडाची, नको भुताखेताची आजी आजोबाची; शेवटी तुझ्या बाबाची नव्हे माझीसुद्धा - कुण्णाकुण्णाची, नजर माझ्या बाळाला लागू नये - असं आईचं हळुवार मन म्हणतं रहातं. बाईची कुसं उजवली की प्रेमाचे असे धुमारे फुटतात. मायेचं जाळं वात्सल्याच्या धाग्यांनी विणलं जातं. शब्द ओवीचा साज लेवू-घेऊन प्रगट होतात. गुणगुणंण एक गोड लय धरते. कामाला हीच साथ वाटून माझ्या सासूबाई म्हणत


-लेकुरवाळीचं काम, काम घ्यावं गं मोलानं
घेऊन बसावं तान्हुलं, विसाव्याला गं खेळणं॥


“ तान्हपारडं घरात असायचचं, त्यांच्या बाळलीलात कामाचा शिणवटा निघून जातो अगं ” हसतखेळत त्या बाळराजांच संगोपन करून आयांनीच कुटुंब बांधून ठेवली, ती टिकवून धरली.


मायमाऊलीचे पांग फेडताना पु. साने गुरुजींच्या ओव्या म्हणत, पुढच्या पिढीला आईच्या कष्टाची जाण त्याच ओव्यात मोहरून आली -


‘ आई तूं हवीस, हवीस जन्मवेरी,
सांग कोण कंटाळेल, अमृताच्या गं सागरी ?॥
माऊलीचे कष्ट कुठं फेडू रे देवा,
तळहाताचा पाळणा, नेत्रीचा केला दिवा॥
त्याला मोल नाही की माप नाही. ‘ माऊलीची माया, माऊलीच्या पोटात
खडीसाखर ऊसात, पिकतसे॥


अशी प्रेमाची पखरणं, मायलेकराच्या कौतुकाला शब्द अपुरे पडावे.


“ फूल उमलेले ओठी ” हे ओवीच जन्मरहस्य आहे. तिला जिवंत श्वासनिश्वासाचा आधार लागतो. साहित्य हे असं एकेकाळी बोलतच येत असे. “ आमचं रामायण, महाभारत असं बोलत गात गातच आले ” असं आपले आवडते साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात.
(प्रस्तावना ग. दि. माडगूळकर)
बाप्पाजींचं नाव सांगण्यात मुलांमुलींना तितकाच अभिमान असतो. मुली तो ओव्यात गुंफतात.
आम्ही तिघी बहिणी, तीन गावाला जाऊ
आधी नाव सांगू, बाप्पाजींचे॥
फुलामध्ये फुल, फुल हुंगावे जाईचे
सुख भोगावे बापाचे बालपणी॥
बाप्पाजी चंदन, घासलिया वास,
आईचा सुवास, दरवळे आपोआप॥


अशा ओव्या-गीतं पाळणा, म्हणत मुलांना जोजावत मी मोठी झाले. पू. साने गुरुजींच्या, आईच्या वरच्या भावाबहिणींच्या प्रेमावरच्या ओव्या, त्याच भावभरी, मराठमोळ्या समाजातल्या ओव्या वाचताना मला कधी कंटाळा आला नाही. भजनं आळवत रहावीत, भक्तीरसं भरून रहावा, तसंच ओव्या म्हणताना प्रेमभाव मनी दाटावा, हृदयाला भिडत जावा. मग वेळोवेळी माझं ही ‘ र ’ ला ‘ र ’, ‘ ट ’ ला ‘ ट ’ जमत जायला लागलं. यमक, मात्रा, ऱ्हस्व दिर्घ ह्या चुका माझे बंधु रामकृष्ण बाक्रे यांनी सुधारल्या. वहिनींनी हातभार लावला.


त्या गप्पांच्या ओघातच विवाहविधी एक महत्त्वाचा संस्कार आहे, आमच्या पिढीला हे संस्कार लागले आहेत, त्यांची ओळख नव्या मुलींना अशीच ओव्या-गीतातून करून द्यावी असं मनानी ठरवलं.


परदेशात राहिल्यामुळे तिकडे त्यांच्या विवाहाची कशी वाताहात लागलीय, श्रद्धेची बैठक नसल्यामुळे काडीमोड कसा चुटकी सारखा होतोय हे पाहिल आहे. स्वैर वर्तनाचे, व्यक्तीस्वातंत्र्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत दिल्यामुळं आपल्या हिंदू लग्नाइतकं टिकलेलं लग्न ‘ अपवाद ’ म्हणून दाखवायला मिळेल, त्याचे परिणाम देशाला भोगावे लागताहेत. बेवारशी मुलं, नशाबाजी, व ‘ एडस् ’ सारखे विकार नव्या पिढ्यांना रसातळाला नेतील की काय ? ते आवरण्याचं काम श्रीमंत देशांना अवघड होऊन बसले आहे. रस्त्यावरची भटक्या मुलांची संख्या गरीबीमुळे वाढत नाही. श्रीमंतीच्या रोपाला लागलेल्या कीडीमुळे वाढत आहे. मग गीता आठवते.


‘ अधर्माभिमवात् कृष्ण प्रदुष्यन्ति ’ कुलस्त्रिय:।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:॥ ’


आपल्याकडे अंधश्रद्धा आहे पण ती भोळ्या मनाने जपली जातीय पण तेही बरं आहे. असं म्हणायची वेळ येते. तसं घटस्फोटाचं प्रमाण कमी होतं व आहे ही. संस्कार विधींची ओळख नव्याने व्हावी, विवाहाचं पावित्र्य निष्ठापूर्वक टिकवलं जावं म्हणून विवाहविधीचा अर्थ (संस्कृत) मंत्रांमधला समजावून घेतला व ते जास्त विस्तारानं, लिहिले गेले इतकेच !


- कमलिनी काटदरे

Product Attachments

View FileSanskar-Sohale-KamaliniKatdare    Size: (322.83 KB)

Additional Information

Product Name In English Sanskar Sohale
Author सौ. कमलिनी काटदरे
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter