Default welcome msg!

आपली संस्कृती : पुस्तक सातवे

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs28

Special Price: Rs12

आपली संस्कृती भाग ७

पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे सातवे पुस्तक.


प्रास्ताविक


संस्कारक्षम बालमनांवर आजीच्या गोष्टींचा परिणाम कसा होतो, त्यातून चारित्र्य कसे घडते हे आपण जाणतो. शतकानुशतके, मुलांना रात्री झोपवताना मोठी माणसे ज्या गोष्टी सांगत आली आहेत, त्यातून जीवनातील शाश्वत मूल्यांची ओळख मुलांना होत आलेली आहे. आजसुद्धा, विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या माणसांनी सांगितलेल्या, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या आणि शहाणपणाच्या गोष्टी ऐकत, उदात्त अर्थाने भरलेली अंगाईगीते ऐकत मुले झोपी जातात. पण वाढत्या शहरीकरणामुळे, कुटुंबव्यवस्था विस्कळित होत आहे आणि निर्वाहाची व्यवस्था करण्यातच मोठ्या माणसांचा बराचसा वेळ खर्ची पडत असल्यामुळे संस्कार करणाऱ्या गोष्टींचा हा मेवा मुलांना दुर्लभ होत आहे. लहान मुलांची मने जीवनाचे कटू अनुभव, तांत्रिक प्रगतीच्या धडाक्यामुळे आणि हृदयविहीन जडवादाचा प्रभाव यांच्यामुळे जोवर झाकोळलेली नसतात, अशा काळातच त्यांच्या आत्मशक्तीचे पोषण होईल असे संस्कार त्याच्या मनावर झाले पाहिजेत. आपली परंपरा, इतिहास आणि संस्कृती याची जाणीव त्यांना हळूहळू करून दिली पाहिजे. त्यांना ते रुचले पाहिजे. त्यांनी ते आत्मसात केले पाहिजे. कैलासवासी कन्हैय्यालालजी मुन्शी यांना वाटले की, या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ग्रंथमाला तयार केली पाहिजे. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त श्री. जी. एम. बारोत यांनी या कार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी संस्थेतर्फे दिली आणि मुन्शीजींच्या दीर्घकालच्या स्वप्नाला वास्तवात आणणे शक्य झाले. या देणगीविषयी कृतज्ञता म्हणून मूळच्या इंग्रजी ग्रंथमालेला ‘महालक्ष्मी मंदिर विश्वस्त संस्था प्रकाशनमाला’ असे नाव देण्यात आले. १९६९ मध्ये मुन्शीजींनी श्री. एस्. रामकृष्णन् हे अध्यक्ष व डॉ. शालिनी आमोणकर आणि श्री. व्ही. अे. के. अय्यर हे दोघे सदस्य असलेली एक समिती या मालेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी नियुक्त केली. या समितीने तयार केलेला अभ्यासक्रम अनेक मान्यवर आध्यात्मिक नेते, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य विद्वान यांच्यापुढे मार्गदर्शन व सूचना करण्यासाठी ठेवण्यात आला. ज्यांनी या योजनेला आशीर्वाद दिले आणि मौलिक सूचना केल्या अशा मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. चक्रवर्ती राजगोपालाचारी, श्री. श्रीप्रकाश, आचार्य विनोबा भावे, कांचीचे जगद्गुरु शंकराचार्य, शृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी रंगनाथानंद, स्वामी चिन्मयानंद, श्री. ल. श्री. पन्द्रिमलाई स्वामीगल, डॉ. चिं. द्वा. देशमुख, डॉ. गोपालस्वरूप पाठक, डॉ. अे. अेल मुदलियार, डॉ. व्ही. व्ही. गुंडाप्पा, डॉ. करणसिंग, डॉ. व्ही. के. गोकाक आणि डॉ. के. आर. अेस. अय्यंगार. भारतीय विद्याभवन या सर्वाचे ॠणी आहे. वेगवेगळ्या इयत्तांसाठी ही पुस्तके कशी काय उपयुक्त ठरतात ते भारतीय विद्या भवनच्या विविध प्रांतातील शाळांमधून पाहता आले. आपल्या देशांत परंपरा आणि संस्कृती यांची जी अक्षुण्ण धारा वाहत आली आहे, तिची जाणीव आपल्या मुलांना व्हावी, मातृभूमीविषयी उत्कट भक्ती त्यांच्या मनांत जागृत व्हावी, त्यांनी हर्षभराने, मुक्तकंठाने म्हणावे, ‘आम्ही सर्व भारतमातेची मुले! भारत अखंड, अविभाज्य आहे! केवढा हा थोर देश! केवढा विलक्षण येथला वारसा..!’ हा संस्कार आपल्या मुलांना देणे हे फार महत्त्वाचे कार्य आहे. संस्कृतिपरिचयाचा हा इयत्तावार अभ्यासक्रम हे भारतीय विद्या भवनने संस्कार निर्माणाच्या राष्ट्रीय कार्यात केलेले नम्र योगदान आहे. भवनच्या या कार्यात ज्यांनी महत्त्वाचा सल्ला, सहकार्य दिले त्या सर्वांचा मी ॠणी आहे. परंतु सर्वांचा व्यक्तिशः उल्लेख करणे कठीण आहे. परंतु कुलपती अेस. बालकृष्ण जोशी, प्रा. अेम. अे. मुझुमदार, प्राचार्य के. अेस. तळपदे, प्राचार्य अेल. अे. व्यास, प्रा. पी. शंकरनारायणन्, प्रा. बी. आर. कुलकर्णी आणि प्रा. आर. अे. काश्यप यांनी ही योजना प्रत्यक्षात आणण्यात विशेष साहाय्य केले आहे. त्यांच्या ॠणाचा मी विशेष निर्देश करतो.


धरमसी एम. खटाव

Product Attachments

View FileAapli-Sanskruti-07-es-849    Size: (285.88 KB)

Additional Information

Product Name In English Aapli Sanskruti Bhag 7
Author अेस. रामकृष्णन्, व्ही. अे. अय्यर
अनुवाद / Translation : स्वर्णलता भिशीकर, वा. ल. मंजूळ
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs28

Special Price: Rs12

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter