Default welcome msg!

बॉम्बे बिट्स

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs70

Special Price: Rs30

बॉम्बे बिट्स

बॉंम्बे बिट्स हे माझं प्रकाशित होत असलेलं पहिलंच पुस्तक.'बॉंम्बे बिट्स'  हे नाव याकरता कारण मुंबई या शहराकडे नेहमीच ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिल जातं,चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला सामावून घेणार मुंबई शहर,अनेक संस्कृतीचं मिश्रण असणारं, कायम प्रगतीच्या दिशेने धावणार हे शहर म्हणून हे शीर्षक.जस जशी पुस्तकातली कथा विस्तारत जाईल तस तसा या शीर्षकाचा अर्थही उलगडत जाईल.पुस्तकात घडणाऱ्या कथेत पात्रांची स्वगत आपणा सर्वांना वाचायला मिळतील.बऱ्याचदा हा स्वसंवाद खूप महत्त्वाचा असतो , बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो.स्वतःच स्वतःला भेटता यावं म्हणून हा अट्टाहास.


थोडंस मनातलं


बॉंम्बे बिट्स हे माझं प्रकाशित होत असलेलं पहिलंच पुस्तक.'बॉंम्बे बिट्स'  हे नाव याकरता कारण मुंबई या शहराकडे नेहमीच ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिल जातं,चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला सामावून घेणार मुंबई शहर,अनेक संस्कृतीचं मिश्रण असणारं, कायम प्रगतीच्या दिशेने धावणार हे शहर म्हणून हे शीर्षक.जस जशी पुस्तकातली कथा विस्तारत जाईल तस तसा या शीर्षकाचा अर्थही उलगडत जाईल.पुस्तकात घडणाऱ्या कथेत पात्रांची स्वगत आपणा सर्वांना वाचायला मिळतील.बऱ्याचदा हा स्वसंवाद खूप महत्त्वाचा असतो , बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो.स्वतःच स्वतःला भेटता यावं म्हणून हा अट्टाहास.


बॉंम्बे बिट्सची जन्मकथाही थोडक्यात सांगते.डिसेंम्बर 2015 मध्ये मी पहिल्यांदा  विक्रम भागवत यांना चेहरेपुस्तकाच्या अर्थात फेसबुकच्या आभासी जगात भेटले ,आम्ही बोललो त्यावेळी मला पूसटशीही कल्पना नवहती कि हीच मैत्री पुढे मला माझ्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाणार आहे.त्याच झालं असं की फेसबुकवर मी कुठेतरी 'न लिहिलेली पत्रे' नावाचं पेज पाहिलं ज्याचे सर्वेसर्वा विक्रम भागवत आहेत.मी त्या पेजवर लिहिण्याची इच्छा व्यक्त केली त्याला  विक्रम भागवतांनी अर्थात प्रोत्साहन दिलं.मग लघुकथा, पत्रमालिका असं लिहीत लिहीत माझा प्रवास सुरु झाला तोवर मी जे काही लिहायचे ते माझ्यापुरतं सीमित असायचं पण नलिपमुळे सार्वजनिकपणे लिहिण्याचीे संधी मिळाली. पुढे नलिप वर माझी दुसरी पत्रमालिका (बॉंम्बे बिट्स) सुरु असताना विक्रम भागवतांनी याच पत्रमालिकेच पुस्तक करायला आवडेल का अस विचारलं आणि मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाउल टाकलं. तोवर विक्रम भागवताना सर म्हणण्यापासून ते विक्रम अशी एकेरी नावाने हाक मारण्यापर्यंतचा प्रवास आमच्या मैत्रीने केला होता. त्यामुळे मनापासून आभार मानते विक्रमचे इतक्या सुंदर मैत्रीसाठी, मला लिहिण्याची संधी देण्यासाठी. सृजन प्रकाशनाचे आभार माझं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. या पुस्तकाला साजेसं असं कव्हर डिझाइन करून देणारे सोहम सबनीस आणि त्यांची टीम यांना विसरून चालणार नाही. त्यांचेही मनःपूर्वक ऋण व्यक्त करते.पुस्तकासाठी ज्या सगळ्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागले आहेत त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार


मला मनोमन खात्री वाटते की पुस्तकाच्या शेवटी आपण काहीतरी चांगलं वाचल्याचं समाधान वाचकांना मिळेल.पुस्तकातली पात्रं,पुस्तकात उलगडणारी कथा या सगळ्यांशी तुम्ही कुठे ना कुठे तरी कनेक्ट व्हाल अशी आशा करून थांबते


- भाग्यश्री भोसेकर-बीडकर

Product Attachments

View FileBombay-Beats-es-1073    Size: (366.17 KB)

Additional Information

Product Name In English Bombay Beats
Author भाग्यश्री भोसेकर बीडकर
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs70

Special Price: Rs30

Customer Reviews

Review by Archana Harish Review by Vikam
Bombay Beats
I must say Bombay Beats is one of the well-studied and well written book. My first impression of the place called Bombay was not good at all. But it’s not the same about this book. Author Bhagyashree has written this book with amazing conviction. She has a great command and authority over all her characters. Though the story revolve around many characters, you don’t lose a track of it.
The amount of research Bhagyashree did while writing this book is commendable. She portrays the fragility as well as the strength of the relationship between people very beautifully. I think every reader can relate to some characters or the incidents at some point , and that’s the success of the writer.
It’s the books for today’s youth written by a young writer!! I am fan of the writer from very beginning. I won’t be surprised if we will see a script written by her for a movie someday. She has mastery in writing fiction.
Good luck for all future plans ! keep writing ! (Posted on 7/22/17)
This is a book which I can read and re - read n number of times Review by Rucha
I liked this book for its fascinating storyline. Somewhere it connects to me since it has dealt with some sensitive social aspects in very sensible ways. All the letters unfold an element of our everyday life. Tue underlying social aspects of this book makes it a good read. A thoroughly enjoyable experience!
Awaiting more of your books Bhagyashree. Thank you for this book and All the best for your next ones! (Posted on 6/14/17)
Bombay Beats.....पुन्हा पुन्हा वाचावी अशी एक अप्रतिम कादंबरी.... congratulations Bhagyashri Tai Review by Aparna
m vachl book......khrch khup mast vatl....prtyek veli vachtana kahitri nvin sapdt tyat.....lekhnit khup takt aahe tumchya.....tighi ekmekinpasun kiti veglya pn kiti shajtene tyanchi naal ektr jodlit tumhi......n grishma mla khup bhavli manala....aapli chuk kbul krun tyatun prt stand hon evdh sop nst......prt ekda manapasun abhinandan......ajun asha khup kalakruti tumchyakdun vachayla milavyat hich apeksha (Posted on 6/11/17)
अभिजित थिटे ह्याचा अभिप्राय Review by Vikam
मुंबईमध्ये भेटलेल्या तीन मुलींची एक गोष्ट नुकतीच वाचली. तिचं नाव बॉम्बे बिट्स. या तिघी आपल्याशी वेगवेगळा, तरीही एका धाग्यात गुंफलेला संवाद साधत जातात. आपल्याला त्यांच्या त्यांच्या विश्वात बोट धरून नेतात आणि त्याचवेळी आपल्यालाही स्वतःमध्ये डोकवायला सुचवतात. भाग्यश्री भोसेकर-बीडकर या मुलीनं लिहिलेली ही कादंबरी. हे ई-बुक घेतलं आणि वाचूनच संपवलं. नाती, त्यांची गुंतागुंत, परस्परविश्वास या सगळ्या गोष्टी भाग्यश्रीनं छान गुंफल्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट फक्त मुंबईची राहत नाही, तर सार्वत्रिक होऊन जाते. कादंबरीतल्या मुली आपल्या घरच्या होऊन जातात; कारण संवादी भाषा. कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याशी वैयक्तिक संवाद साधतं, त्यामुळे ही गोष्ट अलगदपणे आपलीही होऊन जाते.
अभिनंदन भाग्यश्री... (Posted on 6/4/17)
"बॉम्बे बिट्स" Review by Snehal
पुस्तकचं शीर्षक आहे ना त्यातच एक जादू आहे.मुंबई आणि काळजात एक अनामिक हुरहूर असणं हे समीकरण मी फार जवळून अनुभवलंय.बॉम्बे बिट्स च्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या मुंबईच्या आयुष्याची आठवण करून दिल्याबद्दल थँक यु सो मच भाग्यश्री. तिथे जगलेले क्षण पुन्हा जिवंत झाले हे वाचताना .पुस्तक असं मी म्हणणार नाही कारण मला हि एक उत्तम कादंबरीच वाटून गेली आहे.कादंबरी ह्या शब्दाशी मी जास्ती कनेक्टेड आहे म्हणून कदाचित.
तर बॉम्बे बिट्स वाचायला सुरुवात केली आणि कथेत गुंतत गेले. पुढे ती एका उत्तम रीतीने उलगडत ठेवलेली आहे हे प्रकर्षाने जाणवलं. कथेत मुंबईच दर्शन खूप छान घडवलं आहेस.मला ना कथेतल्या सगळ्या पात्रांची , त्यांच्या आयुष्याची आणि एकमेकांबद्दलची असलेली गुंफण खूप भावली. उत्साही तरुणी आणि त्यांच्या स्ट्रगल ज्या पद्धतीने तू दाखवला आहेस त्याबद्दल हॅट्स ऑफ !
सई, इरा, ग्रीष्मा, अलोक, विभा नायर, विक्रम शास्त्री, हिमिका आणि समीर दीक्षित, ह्या प्रत्येक पात्रात काहींना काही स्पार्क आहे, स्पिरिट आहे आणि त्यांना आपण रोज भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो असे सारखे जाणवत होते कारण हि पात्र आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे असतात.वेळ पडल्यास एक भूमिका बजावतात, त्याचे होणारे सकारात्मक अथवा नकारत्मक परिणाम आपण नेहमीच अनुभवतो.
सगळ्यात जास्ती भावली ती इरा कारण ती स्पष्टवक्ती आहे आणि असे लोक मला फार आवडतात. तिचा प्रत्येक गोष्टीबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन तिच्याकडे खेचून घेतो आणि पुढे इरा अशा काही पद्धतीने उलगडत जाते कि आपण ते जिवंत अनुभवतोय असं भासतं. इराने जो महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यावरून ती प्रत्येकाच्या मनात घर करेल इतकी खात्री आहे आणि त्यासाठी लेखिकेचे खूप कौतुक.
सई एक उत्तम उदाहरण आहे.काळजी करणारी, ध्येय न विसरणारी आणि गोड मुलगी. पण असे असूनही तिचे खंबीर व्यक्तिमत्व लपलेले नाही. ते तितकाच महत्वाचा आणि योग्य वेळी रोल प्ले करतं हे खूप महत्वाचं आहे. तिने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती एक आदर्श उदारहरण आहे.
ग्रीष्मा भावनेच्या आहारी जाऊन स्वतःच आयुष्य जरी खराब करून घेते पण नंतर त्याच ताकदीनं पुन्हा उभी राहते हे तू ज्या पद्धतीने दाखवलं आहेस ते दाद देण्यासारखं आहे. अलोकचा समजूतदार स्वभाव एका अशा लेव्हलपर्यंत घेऊन जातो ज्याचा सहसा कुणी विचारही करू शकत नाही. हे पात्र जबरदस्त आहे.
विभा आणि विक्रमची प्रेमकहाणी एका अनोख्या वळणावर पोहोचते तेव्हा दुनिया खरंच गोल आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. इराचे मम्मा बाबा खूप आवडले.
मुंबई या शहरात या साऱ्या पात्रांचा एक प्रवास आहे आणि आणि तो एका उत्तम वळणावर येऊन थांबतो. अर्थात प्रत्येकाचा स्ट्रगल सुद्धा तितका आहे पण इतकं घडूनही सारे शेवटी काही ना काही संदेश देऊन जातात जो हल्लीच्या तरुण पिढीने घेण्यासारखाच आहे.
कथेत असलेले प्रत्येकाचे विचार आणि नाते अतिशय सुंदर आणि विचार करायला भाग पडण्यासारखे आहे. लेखिकेचं प्रत्येक वाक्य हे अर्थपूर्ण असून अगदी प्रोफेशनल वाटावे असे आहे.
मला खूप खूप आवडलंय बॉम्बे बिट्स. भाग्यश्री तू खूपच छान आणि अर्थपूर्ण लिहितेस. असच लिहीत रहा. आणि वाचकांना पुन्हा एकदा सांगायला आवडेल कि जर त्यांनी बॉम्बे बिट्स वाचलं नसेल तर नक्की वाचा. कारण हि कादंबरी मिस करण्यासारखी नाहीये. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करू शकतात. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा भाग्यश्री. (Posted on 5/17/17)
मला स्वतःला अतिशय आवडलेलं बॉम्बे बिट्स हे पुस्तक प्रत्येकाने एकदातरी निश्चितच वाचायला हवं..काहीतरी छान वाचल्याची भावना नक्कीच अनुभवायला मिळेल. Review by Vaishnavi
खरतर पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि मुखपृष्ठावरून मला कथेचा नेमका अंदाज येत नव्हता, एवढच कळत होतं की पुस्तकाची कथा मुंबई शहराच्या अवतीभोवती फिरणार आहे, आणि अंदाज येत नसल्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. पुस्तक वाचायला सुरुवात केली अनुक्रमणिकेत प्रथम स्थानावर प्रस्तावना किंवा मनोगत या शब्दांच्या ऐवजी "थोडंस मनातलं" हे दोन शब्द दिसले आणि या दोन शब्दांनी थेट माझ्या मनाला स्पर्श केला. लेखिकेच्या "थोडंस मनातलं" वाचताना त्यातल्या "बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो" ही अतिशय वास्तववादी ओळ फारच आवडली.
ही खरतर पत्रमालिका आहे जी पुस्तकात एका कथेच्या स्वरूपात मांडली आहे. ही कथा तीन मुलींची आहे इरा, सई आणि ग्रीष्मा. इरा पत्रकार असते, सई डॉक्टर आणि ग्रीष्मा अभिनेत्री. सुरुवातीला वेगवेगळी आयुष्य जगणाऱ्या या तीन मुली कथेच्या शेवटपर्यंत एकमेकींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या असतात. कथेतील इतर पात्र जस की इराचे आई बाबा, सईच संपूर्ण कुटुंब, अलोक, डॉ. विभा, आणि अगदी डॉ. विक्रम सुद्धा वाचकांच्या मनावर आपली छाप उमटवून जातात.
सिनेकलाकारांचं जग हे मृगजळाप्रमाणे असत जे यश त्यांना या क्षणी मिळतंय ते पुढच्या क्षणी त्यांच्यासोबत असेलच असं नाही, व्यसनाच्या अधीन गेलेली अभिनेत्री ग्रीष्मा जिच्या पदरी तिच्याच चूकीच्या निर्णयांमुळे केवळ अपयश येत, ही सुरुवातीला वाचताना मला सुद्धा दोषी वाटत होती पण एका क्षणी मला पण ग्रीष्माला माफ करून टाकावंस वाटलं.
इराचा विचार करताना, तिच्या मुंबईला येण्यापूर्वीच्या आयुष्याविषयी वाचताना तिच्या आई बाबांचा divorce झाल्यामुळे आणि ती बाबांकडे राहत असल्यामुळे ज्या क्षणी तिला आईची नितांत गरज भासते आणि तीची आई तिच्याजवळ नसते म्हणून क्षणभर आपल्याही मनाची घालमेल होते, पण दुसर्याक्षणी असही वाटत की बाबा जगातले सगळ्यात परिपूर्ण माणूस असतात ते सगळ्या गोष्टी नीट करू handle शकतात.
इतर दोघींप्रमाणे सईचं व्यक्तिमत्व सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच आवडायला लागत, एकत्र कुटुंबात, सुरक्षित वातावरणात वाढलेली कर्तबगार, हुशार आणि संस्कारी मुलगी म्हणून तीही छान वाटते.
या तिघींइतकंच मनाला भावलं ते डॉ. विभा यांचं व्यक्तिमत्व. त्यांचं जे वर्णन वाचायला मिळत त्यावरून एक हसतमुख, सुंदर, प्रचंड आत्मविश्वास असलेली, केवळ आपल्या बोलण्याने समोरच्याच मन जिंकणारी डॉक्टर डोळ्यांसमोर उभी राहते. विभाच्या भूतकाळाविषयी वाचताना तीचं आणि डॉ. विक्रमच असलेलं नातं आपल्यालाही आवडू लागत आणि लगेच ते नातं पूर्णत्वास जाऊ शकत नाही हा निर्णय घेताना डॉ. विक्रमच्या आणि निर्णय स्वीकारताना विभाच्या मॅच्युरिटीचं कौतुक वाटत.
भूतकाळ उलगडताना जेंव्हा विभा "आज जाने की जिद ना करो" ही गझल ऐकत असते तेंव्हा ते वाचताना तिथे त्या गझलच्या "तुम ही सोचो जरा क्यो ना रोके तुम्हे, जान जाती है जब उठके जाते हो तुम" या ओळी विभाचं काळीज चिरत गेल्या असतील हे between the lines असल्यासारखं वाटलं. खरंच माणसाच्या आवडीनिवडी खूप काही सांगून जात असतात.
सईचा मित्र डॉ. अलोक याच व्यक्तिमत्व सुद्धा लेखिकेने प्रचंड वेगळेपणाने रेखाटलंय. अलोक जेंव्हा सईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे तेंव्हा क्षणभर वाटत की तो ज्या मुलीवर प्रेम करतो ती सईचं असेल आणि जेंव्हा कळत की तो त्याच्या सिनिअर डॉ.विभाच्या प्रेमात पडतो तेंव्हा खरंच धक्का बसतो. अर्थात त्याचे प्रेमाविषयीचे विचार अगदीच आदर्श आहे, त्याच विभावर निःस्वार्थी प्रेम, त्याची विभाकडून कसलीही अपेक्षा नाहीये तरीही जेंव्हा हे विभाला कळेल तेंव्हा तिची प्रतिक्रिया नेमकी काय असेल या विचाराने क्षणभर धडकीच भरते.
या पुस्तकातल्या मला प्रचंड आवडलेल्या गोष्टी म्हणजे, कथेची मांडणी - कुणीतरी एकाच पात्राने पूर्ण कथा उलगडण्यापेक्षा एकच घटना अनेकांच्या नजरेतून पाहणं आणि वाचन अतिशय छान वाटत, कारण प्रत्येक पात्राची स्वतःची अशी विचार करण्याची पद्धत आहे, मत मांडण्याची शैली आणि स्वतःचे निर्णयही आहेत आणि एक घटना अनेक दृष्टिकोनातून पाहताना कथा सुद्धा छान पद्धतीने पुढे जात असल्याचं समाधान वाचकांनाही मिळतंच.
इराचा वेणूला adopt करण्याचा निर्णय मला स्वतःला फार आवडला.
कथेतल्या सगळ्या पात्रांविषयी आवडलेली एक गोष्ट म्हणजे सगळेजण कमालीचे समजूतदार आहेत आणि सगळ्या व्यक्तिरेखांचा हा समजूतदारपणा हे लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचं आहे हे जाणवत.
अतिशय सोपी साधी तरीही मोहवून टाकणारी आणि वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी लेखनशैली शेवटपर्यंत अनुभवायला मिळते.
आता शेवटी थोडंसं लेखिकेबद्दल, भाग्यश्री भोसेकर बीडकर यांचं हे पुस्तक. ते पूर्ण वाचून झाल्यावर मी त्यांना मेसेज पाठवला आणि त्यांचा आलेला reply वाचताना मला हे खरंच पटलं की त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचा समजूतदारपणा हा कुठेतरी लेखिकेच्या व्यक्तिमत्वात आहे म्हणूनच त्यांना तो शब्दात मांडता आलाय. अतिशय मोकळ्या स्वभावाच्या आहेत त्या, मी जेंव्हा त्यांना मेसेजमध्ये मॅम म्हणाले तेंव्हा त्या मला म्हणाल्या "Call me by my name”.. मला अगदी इतक्या पटकन ते शक्य नाही म्हणून मग मी त्यांना "ताई" म्हणणार असं ठरलं आमचं. त्यांच्याशी बोलण्यापूर्वी मला आलेल्या थोड्याशा दडपणाची जागा त्यांच्याशी बोलताना माझ्याही नकळत त्यांच्याविषयीच्या प्रेमाने आणि आदराने घेतली. असं कुठेच वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा बोलतेय, उलट मला क्षणभर तर वाटत होत की आमची फारच जुनी मैत्री आहे आणि मी माझ्या जवळच्या मैत्रिणीशी गप्पा मारतेय. पण तरीही त्यांना एकेरी संबोधून मला त्यांचा किंचीतसाही अनादर करायचा नाहीये, त्या आता नेहमीकरता माझी ताई आहेत.
“भाग्यश्री ताई तुम्ही इतकं सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल तुमचे आभार मानावेसे वाटतायेत, पण आभार मानून तुम्हाला परकं करायची मुळीच इच्छा नाहीये”
शेवटी इतकाच सांगते की मला खूप आवडलं पुस्तक आणि प्रत्येकानी एकदा नक्की वाचायलाच हवं असं आहे बॉम्बे बिट्स…
:- वैष्णवी.

(Posted on 5/16/17)
आशयघन अशी ‘बॉम्बे बिट्स’ ही कांदबरी तुम्हा सगळ्यांना कुठेही निराश नाही करणार.उलट एक अतिशय सुंदर अशी अभ्यासपूर्ण कांदबरी वाचल्याचे समाधान मिळे Review by suchita
बॉम्बे बिट्स  ही पत्रमालिका वाचण्या अगोदर मी भाग्यश्रीची ‘तो आणि ती’ ही पत्रमालिका वाचलेली होती.जी मला अतिशय आवडलेली होती.त्यामुळे साहजिकच भाग्यश्रीच्या पुढील मालिकेची उत्सुकता होती.आणि मग जेव्हा ह्या मालिकेचे शीर्षक वाचले तेव्हाच वाटले की हे काहीतरी वेगळे खास असणार.

 मग जेव्हा तिने बॉम्बे बिट्स सुरू केली,तेव्हा त्यातील पात्रे हळूहळू उलघडू लागली.नुसतीच उलघडत जात नव्हती तर त्यातील हर एका पात्राला समोर उभं करण्याचे सामर्थ्य तिच्या लेखणीत होतं.सुरुवातीला वाटले की त्या तिघींचे भावविश्व एकत्र सांधणे भाग्यश्रीला जमेल की नाही,पण तिने ते आव्हान लीलया पेलले.पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत तिने कथेचा फ्लो कायम राखला.

  त्यातील पात्रांची कहाणी त्यांच्या वेगवेगळ्या पेश्यामधून चालू झाली.जसं सुरुवातच डॉ.सईच्या जे.जे. ला मुंबईला जाण्याने झाली.आणि मग बॉम्बे बिट्स वाचताना हळूहळू आपल्याही हृदयात ते बिट्स धडधडू लागले.एक गोड निरागस सईची जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती सगळ्यांना खूपच आपलीशी वाटली.पण गायनाकोलॉजीस्ट असणा-या सईने जेव्हा स्त्री भ्रूण हत्येसारख्या ज्वलंत प्रश्नाला हात घातला तेव्हा तिच्यातील हळवी पण कणखर व्यक्तीरेखा समोर आली.मग कोणत्याही परिस्थितीला शरण जाता तिने अखेर पर्यंत टिकवलेली तिची चिकाटी खरंच इतरांसाठी स्फूर्तीदायकच ठरली.

   यातील दुसरी व्यक्तीरेखा इरा.जी स्वतःच एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे.पत्रकारीतेचा वारसा जन्मापासूनच मिळालेला.मग ते बाळकडू अंगात भिनलेले असणारच पण त्याचा उपयोग तिने समाजातील तळागाळात व्यसनामध्ये डुबललेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी केला.खरे तर या तरुणाई मधील व्यसनाधीनते पाठीमागे राजकीय किंवा गुन्हेगारी हात असण्याची शक्यता जास्त.पण मुळातच धाडसी आणि धडाडीचे कतृत्व असणा-या  इराने अभ्यासपूर्व तयारीनिशी यात उडी घेतली आणि यशस्वीही झाली.इरा ही विभक्त आई वडीलांची मुलगी पण तिच्या जडण घडणीमध्ये  दोघांनीही तिची योग्य ती काळजी घेतली.तरीही कुठेतरी काहीतरी उरत होते.त्यामुळे विभक्त आई वडीलांच्या मुलांच्या मानसिक स्थितीवरही खूप चांगला प्रकाशझोत टाकला गेला आहे कथेत.

 यातील तिसरी व्यक्तीरेखा ग्रीष्मा नशेच्या विळख्यात अडकलेली एक सिने कलाकार.तिला या नशेमुळेच  सिनेक्षेत्रातील आपले स्थान गमवावे लागलेली असते.पण डॉ.विभा, तिच्या दोन मैत्रिणी इरा आणि सई यांच्या मदतीमुळे ती लवकरात लवकर यातून बाहेर कशी पडते याचे जिवंत चित्र शब्दरूपात भाग्यश्रीने ज्या रीतीने केले आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.यामध्ये ग्रीष्मा च्या इच्छाशक्तीलाही सलाम करायला हवा कारण तिने ज्या रीतीने स्वतःवर संयम ठेवत नशेच्या विळख्याला स्वतःपासून दूर लोटले ते अगदीच अचंबीत करणारे आहे.

   या कथेतील तिघींची फुलत जाणारी मैत्री त्यांचे भावविश्व अगदी एकत्र सांधण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.एकाचवेळी अनेक विषयांना हात घातला की मुळ मुद्दे कुठेतरी हरवून जातात असे वाटते पण या बॉम्बे बिट्स मध्ये वेगवेगळ्या वळणाने जात असता कुठेही खंड पडत आहे असे अजिबात वाटत नाही.आणि यातच लेखिकेच्या लिखाणाचा दर्जा कळतो.ज्या धाडसी आणि गंभीर मुद्द्यांना तिने मांडलेले आहे ते तितक्याच रीतीने वाचकांपर्यंत पोहचवण्यात ती यशस्वीही झाली आहे.ज्वलंत मुद्द्यांची धग नुसतीच शब्दबद्ध केली आहे असे नाही तर या समस्यांवर उपायही शोधला आहे.सामाजिक विषयांना हात घालून वाचकांना विचार प्रवृत्त करण्यात ती कुठेच मागे पडली नाही.

   मी सगळ्यांनाच विनंती करते की आशयघन अशी ‘बॉम्बे बिट्स’ ही कांदबरी तुम्हा सगळ्यांना कुठेही निराश नाही करणार.उलट एक अतिशय सुंदर अशी अभ्यासपूर्ण कांदबरी वाचल्याचे समाधान मिळेल (Posted on 5/14/17)
अतिशय दर्जेदार ..... Review by Sanjan
बॉम्बे बिट्स …..
……...
हा एक प्रवास आहे, तरूणाईचा. तरूणाईमधल्या तरूणींचा. त्यांच्या उलगडत जाणाऱ्या भावविश्वाचा. स्त्रीजन्माचे स्वागत आपल्याकडे किती मनापासून केले जाते ? लिंगनिदानातून, गर्भपातातून वाचलेल्या, या नकोश्या झालेल्या मुली मिळेल तशी स्वतःची वाट चालत राहतात. समोर येणारी आव्हाने “ येस आयएम स्ट्रॉंग “ म्हणत लिलया पेलत राहतात.

इथे प्रत्येकाचे एक अवकाश आहे, प्रत्येकाचे स्वतंत्र भावविश्व आहे. यातली पात्रे कमालीची समजूतदार आहेत. येथे प्रत्येकजण दूसऱ्याच्या मताचा कमालीचा आदर करतो. प्रेमातही समंजसपणा आहे. वियोगात कसला आक्रस्ताळेपणा नाही. ही माणसे जोडली गेली आहेत एका समान सुत्राने. इथे प्रत्येकाला स्वतःचे करिअर महत्वाचे, येथे प्रत्येकजण आगोदर स्वतःला सिद्ध करू पाहतोय. भावभावना मग नंतर. तरूणाईसाठी हा फार मोठा संदेश आहे.

सध्याची तरूणाई येवढे आशयघन लिहू शकते ? बरेच दिवस भेडसावणारा हा प्रश्न “ बॉम्बे बिट्स “ ने सोडवला. या कादंबरीने वाचण्याचा आनंद दिला. मुंबईसारख्या विस्तृत पटावर केवळ सात ते आठ व्यक्तिरेखा घेवून, कोणताही लेखकिय अभिनिवेश मध्ये डोकावू न देता, त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दात उलगडवण्याचे कसब लेखिकेने लिलया साधले आहे. पात्रांचे साधे सपाट निवेदन ही एक फार मोठी ताकद आहे या कादंबरीची. तेवढेच कठीणही आहे ते. येथे तपशिलासाठी, वातावरण निर्मीतीसाठी, स्थळवर्णासाठी अजिबात पाने खर्च केलेली नाहीत. कसलंही पाल्हाळिक नाही. गर्भलिंग निदानातून, गर्भपातातून वाचलेल्या, जिवंत राहिलेल्या नकोश्या झालेल्या मुली स्वतःची वाट स्वतः चालत, आव्हाने पेलत, “ येस आय एम स्ट्रॉंग “ म्हणत स्वतःच्या आयुष्याला हवे तसे वळण देवू शकण्याची क्षमता निर्माण करतात. पत्रकारिता, वैद्यकिय व्यवसाय, चंदेरी दुनियेची सफर त्यातील इनसाइड स्टोरीज, तरूणाईतली व्यसनाधिनता, स्त्रीभृणहत्या, या सारख्या सामाजिक प्रश्नावर ही कादंबरी आपल्या परीने उत्तर शोधू पाहते.

सर्वांनी अवश्य वाचावी अशी ही कमालीची दर्जेदार कादंबरी आहे ही. (Posted on 5/12/17)

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter