Default welcome msg!

रुच्चीक भाग १

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

रुच्चीक भाग १

गोमंतकीय पाकशास्त्रावरील पुस्तक


A book of Goan recipes


थोडंसं लोणचं. . .


रुच्चीक’ हे अमिताबायचं दुसरं पुस्तक. ‘आदी जेव मागीर देव’ अशी कोकणी म्हण आहे. तिच्या पहिल्या पुस्तकावर मी बोललो होतो. आता या दुसऱ्या पुस्तकावर मी लिहितो आहे. बोलणं आणि लिहिणं एवढंच आम्हाला जमतं. आमची बोलाचीच कढी, बोलाचाच भात. अमिताबाय बोलते, लिहिते आणि स्वयंपाकही करते. अमिताबाय एकावेळी कितीकिती तरी गोष्टी करते. समाजकार्य, दूरदर्शनवर कार्यक्रम, रंगभूमीवर अभिनय करते. ‘रुच्चीक’ ही तिची स्वनिर्मित मालिका अत्यंत लोकप्रिय बनली आहे. वेळात वेळ काढायला अमिताबायला कुठला वेळ मिळतो तेच कळत नाही. प्रत्येक गोमंतकीय हा ‘घरच्यांबरोबर जेवण’ या गोष्टीला महत्व देतो. कामावरून घरी आल्यावर सौभाग्यवतीच्या हातचं जेवण जेवून थोडीशी विश्रांती घेणं हे ‘गोंयकारपणाचं’ एक लक्षण आहे. मुंबईची ‘हॉटेल-संस्कृती’ किंवा ‘डबा संस्कृती’ गोयंकाराला अजून तेवढी रुचत नाही. पण कधीकधी दुर्दैवानं असंही घडतं की ‘‘घरचं जेवण मिळावं म्हणून लग्न केलं. पण बायको-पोरांना पोसायला बाहेर जातो-बाहेरचं जेवतो.” स्वयंपाकामध्ये जशी ‘रुची’ हवी तशीच लेखनामध्येही ‘रुची’ हवी. लिहिताना लेखणीच्या टोकावर ‘रुची’ येते जशी स्वयंपाक करताना बोटांना नजर येते. हाताच्या बोटांमध्ये ‘रुची’ उतरत असते ज्याला ‘रुची’ नाही, त्याला रांधता येणार नाही आणि लिहिताही येणार नाही अमिताबायच्या बोटांत ‘रुची’ आहे आणि लिखाणातही ‘घम-घम’ आहे. वाचूनच जिभेला पाणी सुटतं. लेखन आणि स्वयंपाक यांतील आणखी एक समान गुण म्हणजे प्रमाण. कुठले शब्द कुठं घालावेत केव्हा घालावेत, याची ‘जाण’ असल्यावरच चांगला लेखक बनतो. मसाला केव्हा आणि किती घालावा याची जाण असणारा चांगला स्वयंपाकी बनतो. जास्त मसाला घातला की जेवण जास्त ‘रुच्चीक’ किंवा जास्त ‘झणझणीत’ होईल असं सांगता येणार नाही. अन्न शिजविताना एक पथ्य पाळायला हवं ते म्हणजे त्या त्या जिन्नसाचं मूळ, नैसर्गिकपणा नष्ट होऊ देता कामा नये. आमची भारतीय पाककला याकडं तेवढं लक्ष देत नाही. मसाल्याचा अतिवापर केल्यानं काही जिनसांची मूळ रुची नष्ट होते. काय खावं? अमेरिकन शास्त्रज्ञ Benjamin Franklin म्हणतो, One of the rules of success in life is to eat what you like. Let the foods sort it out inside. (जीवनात यशाचा एक नियम म्हणजे आपणास हवं ते खावं. अन्नाला मग पोटात तडजोड करू दे. पोटाला विचारा आणि रुचीला विचारा आणि त्याप्रमाणं खा.) अमिताबायच्या या पुस्तकात कित्येक गोमंतकीय पाककृती आहेत. उदा. ‘किस्मूर’, ‘बांगड्याची उडीदमेथी’, ‘सुके’, ‘डांगर’, ‘हुमण’, ‘धबधबीत’. गोव्याच्या हॉटेलांत आता गोमंतकीय पद्धतीचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. घरातही जेवण बदलत चाललं आहे. गोमंतकीयांची संस्कृती म्हणजे ‘मत्स्यसंस्कृती’. ती अलीकडंच ‘चिकनसंस्कृती’ झाली आहे. कुठल्याही पार्टीला भरपूर मासे असले; पण तिथं चिकन नसलं तर शेंबडी पोरंसुद्धा कसं नाक मुरडून म्हणतात, ‘‘ शी... त्यांच्या जेवणात चिकन नव्हतंच.” ‘रांधणं’ ही जशी एक कला, तशीच जेवणाची मांडणी वा जेवण वाढणं ही एक कला. एकेक पाककृती सांगण्याआधी अमिताबाय एक लहानशीच ‘रुच्चीक’ (रुचकर) अशी प्रस्तावना लिहिते. या प्रस्तावनेतून ती वाचणाऱ्यांचं मन तयार करते. खवय्यांच्या जिभांना ती गुदगुल्या करते. अन्न साहित्याबरोबर अमिताबाय शब्दसाहित्य देते. तिची प्रस्तावना म्हणजे ‘रुच्ची’ आणणारी ‘किस्मूर’ (कोशिंबीर) असते. अमिताबायनं पदार्थांना दिलेली शीर्षकही समर्पक असतात. शिवाय या अन्नशास्त्राबरोबर अमिताबाय सल्लाही देते. उदा. ‘आपल्या आहारात जास्तीत जास्त भाजीचा समावेश करणं, हे निरोगी राहायचं एक उत्तम साधन आहे. कच्च्या भाज्या खाणं, ही तर आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशी बाब आहे. अमिताबायच्या या ‘रुच्चीक’ पुस्तकाला तशी प्रस्तावनेची गरज नव्हती. ही प्रस्तावना नसून ते आहे थोडंसं लोणचं. तुमची ‘ रुची’ जागवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी...!!


-मनोहरराय सरदेसाय -  पणजी

Product Attachments

View FileRuchchik Part - 1    Size: (325.35 KB)

Additional Information

Product Name In English Ruchchik Part 1
Author अमिता नायक सलत्री
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter