Default welcome msg!

आनंददायी आरोग्यासाठी

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

आनंददायी आरोग्यासाठी

ज्या वनस्पती आपल्याला आपल्या दारात, घराबाहेर सहज बघायला सापडतात अशा वनस्पतींपासून योजलेल्या गुणकारी उपायाची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. हे सोपे, साधे उपाय पुढच्या पिढीला ज्ञात व्हावेत हाच उद्धेश आहे.

प्रस्तावना
मला माझी आजी अजिबात आठवत नाही; पण पणजी मात्र आठवते आहे खूप छान होती माझी पणजी. अगदी शांत, प्रेमळ, अबोल. लहानपणी काही लागले तर रडत रडत पणजीजवळ जायचे; मग ती आपल्या बटव्यातली काही घरगुती औषधे काढायची. तिने दिलेल्या औषधांनी दुखणे कुठल्या कुठे पळून जायचे. आई-बाबांनी दिलेल्या औषधांपेक्षा तिची औषधे खूप छान वाटायची. अधिक गुणकारी आणि शरीराला कमी अपायकारकी असायची. आणि शिवाय ती औषधे देताना तिच्या प्रेमळ हाताचा हातगुणही बहुतेक करून त्यात उतरलेला असणारच ना ! तिच्या पोतडीतून कधी ती एखादी मुळी काढायची, ती उगळायची, त्याचे चाटण करायची, तर कधी कसले कसले काढे करायची. कधी कोणत्या तरी पानाचे पोटिस करून किंवा डाळीचे पोटीस करून गरमागरम, फुंकरत फुंकरत जखमेवर बांधले जायचे, कधी रक्तचंदनाची बाहुली सहाणेवर उगाळून त्याचे गरम गरम द्रावण सूज आलेल्या जखमेवर लिंपले जायचे. एक ना दोन अनेक प्रकारचे घरगुती उपाय तिला ज्ञात होते. त्याचा उपयोग साऱ्या घरादाराला धडपडणाऱ्या आम्हा लहान मुलांना नेहमीच व्हायचा आणि तिच्या या उपायांचा गुणही अगदी लगेच यायचा. आई वडिलांचा दवाखाना, खर्च वाचायचा आणि सर्दी खोकल्यासाठी ऊठसूठ अँटिबायोटिक्ससारखी महागडी औषधेही घ्यायला लागायची नाहीत. वडिलांच्या खिशाला चाट बसायची नाही. पणजीच्या गोष्टी वेल्हाळ स्वभावाचा, मऊ मायेचा ऊबदार स्पर्श मला अजून आठवतो. या घरगुती उपाय योजनेनी आम्ही केव्हा बरे होऊन जायचो ते कळायचेही नाही. आता घराघरातून ‘ आजी ’ ही सुंदर गोष्टच हरवत चालली आहे. त्यातूनही आजची आजी आधुनिक झाली आहे. आधुनिक होताना ती हे साधे साधे घरगुती उपाय विसरली आहे. तिच्या कनवटीचा बटवाही आता कुठेतरी धामधुमीच्या काळात गायब झाला आहे.
आपल्या देशात खरोखरीच अनेक औषधी वनस्पती आहेत. आपल्या अवतीभोवतीच असणाऱ्या अनेक वनस्पती ह्या अत्यंत गुणकारी आहेत. आजही यातील वनस्पतीचे गुणधर्म खेड्यापाड्यातील अनेक जणांना ज्ञात आहेत. ते आजही त्याचा सररास उपयोग करतात. हे सर्व उपाय आपल्याला माहीत नाहीत. त्याच्यावर खरे तर खूप संशोधन होणे गरजेचे आहे. अशा गुणकारी वनस्पतीची माहिती एकत्रित संकलित होणेही महत्त्वाचे आहे. पण हे घरगुती उपाय हळूहळू नष्टच होत चालले आहेत आणि त्या जागी अत्यंत महागडी, कधी कधी आपल्या दुखण्यावर तात्पुरता उपाय करणारी पण शरीराला अपायकारक अशी औषधे बाजारात येत आहेत. म्हणूनच या पुस्तकाच्या निमित्ताने आजीबाईच्या बटव्याचा जरा परिचय करून घेऊ यात. अर्थातच ही घरगुती औषधे तशी तारतम्यानीच वापरायची, हे नक्की ! या सर्व गुणकारी औषधी वनस्पतींच्या मागे काही सांस्कृतिक, पारंपारिक इतिहासही आहे. शक्य असेल तिथे जाता जाता त्याचाही परिचय करून घेऊ यात. अनकेदा या वनस्पतींचे उल्लेख आपल्याकडील पुराणकथांमधून आढळतात. ते जाणून घेणेही खूप मजेशीर आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीशी आपला परिचय होऊ शकेल. आपली संस्कृती खूप श्रीमंत आहे. ती जरी वरवर खूप धार्मिक दिसत असली तरी तिने शास्त्र, आहारांचे नियम यांचा खूप बारीक अभ्यास केलेला आहे. फक्त हे सारे अगदी सहजपणे धार्मिक गोष्टींमध्ये गुंफून टाकलेले आहे, ज्यामुळे अगदी सामान्य जनांना असे वाटावे की आपण धर्माचे पालन करीत आहोत. हा श्रीमंत वारसाही आपल्यापुढे या निमित्ताने परत यावा असे योजिले आहे.
यामध्ये अगदी सोपे उपाय आहेत. ज्या वनस्पती आपल्याला आपल्या दारात, घराबाहेर सहज बघायला सापडतात त्यांचा विचार केला आहे. या निसर्गदत्त वनस्पतींपासून योजलेले उपाय गुणकारी आहेत. हे सोपे, साधे उपाय पुढच्या पिढीला ज्ञात व्हावेत म्हणून हा प्रयत्न आहे.
डॉ. माधवी वैद्य

Product Attachments

View FileAnanddayi arogyasathi    Size: (369.48 KB)

Additional Information

Product Name In English Ananddayi Arogyasathi
Author डॉ. माधवी वैद्य ,वैद्य लीना राजवाडे
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs58

Special Price: Rs30

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter