Default welcome msg!

वयम् सप्टेंबर २०१७

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs60

Special Price: Rs20

वयम् सप्टेंबर २०१७

अहम् आवाम् वयम् आपण सारे


विविधतेतली गंमत


आम्ही पाचवीत असताना, एक मुलगा एका खेडेगावातून आमच्या शहरातील मराठी शाळेत आला. त्याची भाषा वेगळी होती. वेगळेच शब्द वापरायचा तो. पेन्सिलीला टोक काढायच्या शार्पनरला तो म्हणायचा ‘गिरमिट’, आणि वहीत उत्तरं लिहिली आहेत, हे सांगायला शब्द वापरायचा- ‘गिरगिट’... तो असे शब्द बोलला की, आम्ही सर्वजण फिदीफिदी हसायचो त्याला! वर्गात एक मुलगी होती, अभ्यासात कच्ची आणि अबोल. चित्रे मात्र फारच सुंदर काढायची, पण गणिताच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला बरोबर येईल तर शपथ! साधीसाधी गणितंही नीट येत नाहीत, म्हणून जाम टर उडवायचो आम्ही तिची. रोज भारताची प्रतिज्ञा म्हणताना ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन..’ हे वाक्यही मोठ्याने रेकायचो आम्ही. पण त्या वाक्याचा अर्थ कधी समजून घेतला नाही. या विविधतेने नटलेल्या परंपरांचे अंश वर्गात होते, तरी त्याकडे लक्ष देण्याची तसदी आम्ही कधी घेतली नव्हती; याचं आता वाईट वाटतं, खंत वाटते. ‘विविधता’ समजून घेण्याची आणि तिचा आदर करण्याची कुवत नव्हती आमची.. तुम्ही आजची शालेय मुलं विविधता जाणून घेता, त्याबद्दल उत्सुकता दाखवता, हे बघून तुमचं कौतुक वाटतं. विविधतेचा किती सहज स्वीकार करता तुम्ही! परवा अ. भि. गोरेगावकर शाळेत झेंडावंदनाला गेले होते. १५ ऑगस्टला तेथे वर्गावर्गांचे प्रकल्प मांडलेले असतात. प्रत्येक वर्ग एकेका विषयावर त्यांना पाहिजे त्या रीतीने वर्गभर मांडणी करतो. गेले ५० वर्षें हा उपक्रम चालू आहे. फार मजा येते ते प्रकल्प बघायला. यंदा प्राथमिक शाळेतील मुलांनी ‘विविधता’ हा विषय भन्नाट साकारला होता. प्राथमिक इयत्तांची सर्व मुलांनी मिळून एकच मोठ्ठी मांडणी केली होती. या मुलांनी लांब-रुंद कागद एकमेकांना चिकटवून, त्याला पाठीमागे वर्तमानपत्राच्या कागदाचा मुलामा देऊन कागदाचे मजबूत मोठ्ठे फ्लेक्स तयार केले होते. ते छताच्या भिंतीला टांगले होते आणि खाली जमिनीपर्यंत सोडले होते. लहान मुलांना असं मोठ्ठं काही करायला मिळालं की, खूप आनंद होतो आणि त्यांच्या ते कायम लक्षात राहतं, असं त्यांच्या शलाकाताईचं मत. शलाकाताई मुळात चित्रकार आहेत आणि शिक्षणशास्त्रही त्यांनी अभ्यासलंय. त्यांची ही कल्पना मुलांनी एकदम उचलून धरलीये. शिक्षक व पालकांच्या मदतीने मुलांनी एकेका फ्लेक्सवर विविधतेचा एकेक पैलू साकारला होता. विविध पक्ष्यांचं जग, माशांची दुनिया, फुलपाखरे यांच्या कलाकृती चितारून, कापून 3D पद्धतीने चिकटवल्या होत्या. त्यात एक फ्लेक्स एकदम हटके होता- ‘किती या भाषा’! यांत काही शब्दांचे बोलीभाषेतील प्रतिशब्द लिहिले होते- वर्गातील मुले ‘भाताची पेज’ला कोणकोणते प्रतिशब्द वापरतात, ते ते शब्द लिहिले होते- खिमट, खिमटी, झार, भाज, पेजवणी, असे अनेक. घरात दाणे भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘उलथणे’ला मुलांनी प्रतिशब्द लिहिले होते- उलातन, काविलता, उलथा, कालथा, गंटी, रोट्याकडी, पलिता, इत्यादी भाजी चिरायची विळी, भात वाढण्याचा चमचा यांनाही घरोघरी काय काय संबोधले जाते, त्यातील वैविध्य वाचताना मजा आली. माध्यमिक शाळेतील एका वर्गाने ‘विविधता’ या विषयांवर प्रकल्प करताना मुलांच्या व्यक्तिमत्त्वांचे विविध प्रकार- ज्यात स्वमग्नता, चंचलता, विविध प्रकारची दिव्यांगता यांची माहिती मिळवली होती. गेल्या आठवड्यात जोगेश्वरीच्या अस्मिता शाळेत गेले होते. तिथे १५ ऑगस्टचे गाणे बसवण्यासाठी काही मुले एकत्र जमून चाल बसवत होती. एका ‘दिव्यांग’ ताईच्या भोवती ही १०-१२ मुले बसली होती. ती दृष्टीहीन ताई हार्मोनियमवर चाल वाजवून ‘दाखवत’ होती. अतिशय तन्मयतेने त्या गटाचे काम सुरू होते. मला खात्री आहे, तुम्ही मुले वेगळ्या बोलीभाषेत बोलणाऱ्या, वेगवेगळी बुद्धिमत्ता व क्षमता असलेल्या तुमच्या वर्गमित्रांना समजून घेत असाल. त्यांना चिडवत नसाल; तर त्यांचे वेगळेपण जाणून घेऊन तुम्ही एकत्रितपणे सर्व व्यवहार करत असाल. विविधतेत गंमत असते. विविधता ही ताकद असते. विविधता नसेल तर सगळं जग एकसमान दिसेल. एका साच्यातून काढल्यासारखं होईल. मागे एक पुस्तक वाचलं होतं Thomas L. Friedman या अमेरिकन लेखकाचं- The World is Flat Ñ A Brief History of the Twenty-first Century नावाचं. त्यात सुरुवातीला मुंबईची काही वर्णनं आहेत. मुंबई कशी अमेरिकेसारखी होऊ लागली आहे, याची. जागतिकीकरणाच्या परिणामांनी मुंबईचं ‘मुंबईपण’ हरवत चालल्याच्या खुणा होत्या त्या! ते वाचताना जाणवते की, जागतिकीकरणाचे फायदे आपल्या सर्वांना मिळाले आहेत. मात्र या प्रक्रियेत व्यक्तीने, समाजाने किंवा देशाने प्रगती करताना आपले आगळेपण नष्ट करण्याची गरज नसते. आपली गुणवैशिष्ट्ये जपून प्रगतीच्या वाटेवर चालता येतेच की! तुम्हा मुलांमध्ये तर मुळातच किती वेगळेपण असतं. ते हुडकून काढून तुम्हांला तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करणं, हे आमच्यासमोरचं आव्हान आहे. आपल्या ‘अनुभव स्पर्धे’सारख्या विविध स्पर्धांतून, ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पामधून जशी वेगवेगळी कौशल्ये असलेली मुलं समोर येत आहेत, तशी आता मैदानी बुद्धिमत्ता असलेली मुले शोधून त्यांना खेळात नैपुण्य मिळवण्यासाठी मदत करणारा एक उपक्रम आपण आखलाय. ‘वयम्’च्या वाचनाच्या प्रांगणात बहुविध बुद्धिमत्ता असलेल्या मुलांनी यावे आणि विकसित होत जावे, असा प्रयत्न आहे. या प्रयत्नात अनेक दिग्गज व्यक्ती तुम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी आतुर आहेत. तुमच्या भरघोस प्रतिसादातून हाही उपक्रम यशस्वी होणार आहे.


- शुभदा चौकर

Product Attachments

View FileWayam September 2017    Size: (5.44 MB)

Additional Information

Product Name In English Wayam September 2017
संपादक शुभदा चौकर
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs60

Special Price: Rs20

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter