Default welcome msg!

धांडोळा

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs87

Special Price: Rs50

धांडोळा

आतंकवादा विरुध्द लढणाऱ्या ए टी एस ओफिसिरची शोकांतिका


Tragedy of upright ATS officer who puts up a fight against terrorism


प्रकाशकाचे मनोगत


धांडोळा ही विक्रम भागवतांची पहिलीच कादंबरी. २०१२ मध्ये त्यांनी ही कादंबरी लिहिली आणि २०१३ मध्ये ई-साहित्य प्रतिष्ठान ने ती ई-बुक म्हणून प्रसिद्ध केली. प्रसिद्धीची संकल्पना सुद्धा आगळी वेगळी अशी होती. सुरुवातीला तिचे फक्त पहिले प्रकरण प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यांना हे पहिले प्रकरण वाचून संपूर्ण कादंबरी वाचायची इच्छा असेल त्यांनी विक्रम भागवत ह्यांच्या कडे त्या कादंबरीची ई-प्रत मिळण्याची विनंती नोंदवावी असे जाहीर करण्यात आले. जवळ पास २२०० वाचकांनी अशी मागणी त्यांच्या कडे नोंदवली..केवळ २ महिन्यांच्या कालावधीत. ह्या कादंबरीची नोंद सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स सारख्या लोकप्रिय दैनिकांनी सुद्धा घेतली हे विशेष.


ही कादंबरी वाचल्यावर सुप्रसिद्ध अभिनेते आणि एक सुजाण वाचक सुरेश भागवत ह्यांनी असे म्हटले होते की ही एक बंडखोर व्यक्तिरेखांची कादंबरी आहे. आणि ते खरेच आहे. सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेमधील दांभिकपणा विरुद्ध ह्या कादंबरीमधील सर्वच व्यक्तिरेखा आपापल्यापरीने उभ्या राहतात.


प्रमुख व्यक्तिरेखांच्या निवेदनातून ही कादंबरी अत्यंत झपाट्याने पुढे जाते. तो वेग इतका असतो की कादंबरी संपवल्या खेरीज खाली ठेवता येऊ नये.  काही पात्रांच्या तोंडी असलेली शिवराळ भाषेवर  आक्षेप येतील की काय अशी सुरुवातीला आशंका होती. भागवत आपल्या व्यक्तिरेखांच्या भाषेवर ठाम होते.  त्यांचे म्हणणे होते की व्यक्तिरेखांनी त्यांची भाषा बोलणे आवश्यक असते नाहीतर त्या वाचकाला खऱ्या वाटत नाहीत. पण बहुसंख्य वाचकांनी संपूर्ण कादंबरीचे आणि व्यक्तिरेखांच्या भाषेचे समर्थनच केले.


प्रेमानंद हिर्लेकर हा एटीएस ऑफिसर आणि पत्रकार आशु काळसेकर ह्या दोन प्रमुख व्य्क्तीरेखांच्या माध्यमातून ह्या  कादंबरीमधील संघर्ष उभा रहातो. हा संघर्ष ह्या दोन व्यक्तिरेखांचा नाही तर त्यांना उभे आडवे छेद देणाऱ्या...त्यांच्या आयुष्यातील इतर व्यक्तिरेखांचा सुद्धा आहे.


प्रसिद्ध समीक्षक श्रीनिवास हवालदार ह्यांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे ही कादंबरी मराठी कादंबरीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल ह्या विश्वासाने सृजन ती पुन्हा प्रकाशित करीत आहे.


 


सृजन

Product Attachments

View FileDhandola    Size: (826.68 KB)

Additional Information

Product Name In English Dhandola
लेखक विक्रम भागवत
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs87

Special Price: Rs50

Customer Reviews

सचिन मणेरीकर Review by Vikam
धांडोळा –विक्रम भागवत

कोणतही पुस्तक वाचायच्या आधी आपल्याला त्याचा विषय,लेखकाची शैली हे सगळ माहित असत त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल काही पूर्वग्रह होतात,काही अपेक्षा निर्माण होतात.पण काल असच योगायोगाने विक्रम भागवत यांची धांडोळा ही कादंबरी हातात आली.हिच्याबद्दल मी काही ऐकले नव्हते आणि नावातून किंवा चित्रावरून सुद्धा काही विशेष बोध होत नव्हता.त्यात हे ई बुक होते जे मी या आधी कधीच वाचले नव्हते त्यामुळे खर तर ती मी पूर्ण वाचेन कि नाही हीच शंका होती.पण एकदा वाचायला सुरु केल्यावर पूर्णपणे हादरायलाच झालं.एका दिवसात वाचून संपवली आणि वाटून गेल याबद्दल सगळ्यांना सांगाव.

वास्तववादी लिखाण हा शब्द खरतर नको तिथे आणि नको तितका वापरून गुळगुळीत केला गेला आहे.पण काल मला पहिल्यांदाच कळल कि वास्तववादी लिखाण कशाला म्हटलं जात.यातली सगळी पात्र अगदी खरी वाटतात,कुठेही कोणताही नाटकीपणा नाही. या कादंबरीत अगदी भरपूर शिव्या आहेत (शिव्यांची अलर्जी असणाऱ्यांनी दूर राहावे ) पण वाचताना एकदा सुद्धा अस वाटत नाही कि याठिकाणी हि शिवी का आहे ,इथे शिवी नसती तरी चालल असत. प्रत्येक शिवी हि गरज म्हणून आलेली आहे .

खूप वर्षानंतर अस रात्री तीन वाजेपर्यंत जागून काहीतरी वाचलंय.यात काय आहे ,याचा विषय कसला आहे हे काही मला सांगायचे नाही ,जसा अनुभव मला आला तसाच तुम्हाला यावा अस मला वाटत .

नक्की वाचा “ धांडोळा ”
www.bookhungama.com वर
- सचिन मणेरीकर (Posted on 6/14/17)
उत्तम विषय, उत्कृष्ट लेखनशैली.. Review by Mugdha
“धांडोळा” मी वाचलेली पहिली मराठी कादंबरी. मी आजकालच्या मुलांसारखं मराठी वाचत नाही हा माज नाही हे सांगण्यामागे. मराठी वाचायला वेळ लागतो आणि सलग खूप वाचायला प्रॅक्टिस.. हे दोन्ही करायला वेळ नसल्यामुळे मराठी थोडं बॅकसीटवर राहिलं.. इतकंच..


Usually, जेव्हा आपण एखादं पुस्तक घेतो वाचायला तेव्हा आपल्याला त्या लेखकाबद्दल काहीच माहीत नसते, किंबहुना तेवढीच माहिती असते जेवढी जगाला आहे. तुम्हाला मी तुमची कादंबरी वाचण्याच्या आधीपासून ओळखत होते, आता तुम्ही म्हणाल ‘To think that you know someone is a myth’ हो, ठिके.. मला तुम्ही थोडे का होईना माहिती होतात..जेवढं स्वतःला माझ्यापुढे एक्सपोज केलं होतं तेवढे मला तुम्ही माहिती होतातच! तर, आपण काही लेखकाना ओळखत नसतो, त्यांच्याशी बोललेलो नसतो.. आणि in more than 80% of cases असं काही घडण्याचा चान्स पण नसतो.. पण लेखकाला ओळखणं आणि त्याची कादंबरी वाचणं हे वाचकासाठी किंचित अवघड होऊ शकत.. पुस्तकाच्या बाहेरच्या लेखकाच्या शैलीशी आपला काडीचाही सबंध नसतो. धांडोळा वाचायला घेतलं तेव्हा आपसूकपणे त्यात तुम्हाला शोधत होते. तुम्ही निर्माण केलेली पात्र कुठेतरी तुमच्यासारखीच असणार.. किंवा तुम्हाला आवडणाऱ्या माणसासारखी असणार..
पुस्तक हातात घेतलं ते खाली ठेववलंच नाही.. ठेवावंस वाटलंच नाही.. तरीही स्लो स्पीडमुळे वाचायला वेळ लागला.. खरंच धांडोळा.. प्रचंड गुंतागुंती.. खूप पात्र, खूप विषय, खूप बकग्राऊंडस.. सगळंच खूप इंटेन्स.. पण कुठे कशाची सरमिसळ? कुठेच नाही. कुठे एखादं प्रेजुडीस ओपिनियन, ज्याला खूप वाव होता खरंतर, (ब्राह्मणांबद्दल म्हणजे पर्यायाने तुम्ही स्वतःबद्दल लिहिताना आणि मी स्वतःबद्दल वाचताना) पण नाही, there was no prejudice in your writing and hence I did not read it with prejudice. And I'm sure the same must've been true for a lot of readers. कुठेही दोन फिलींग्स, इमोशन्स, क्याराक्टर्सची खिचडी झाली नाही. भूतकाळ, भूतकाळातील भूतकाळ.. त्यातून वर्तमानात अक्षरशः एखाद्या अलगद लाटेवर खाऊ तश्या गटांगळ्या खात होतात.. आपसूक होतं ते सगळं.. effortless.. that is the first beauty of this novel.


किती प्रचंड diversity आहे अख्ख्या कादंबरीत! मुंबईचा हायफाय एरिया काय रमाई नगर ची झोपडपट्टी काय, रेलवेच्या इथली टेकडी काय किंवा प्रेमाची दिडदमडीची खोली काय आणि अफझलची मुसलमान वस्ती.. वाचकाचा हात धरून त्याला तुम्ही प्रत्येक ठिकाणची सफर घडवून आणली आहे.. मग ती अफझलच्या घरातल्या मधल्या मोठ्या, पडद्यापाठच्या खोलीतली असो किंवा पाशीच्या घरातल्या सुंदर वॉशरूमची असो.. बेस्टमधल्या आशूच्या लाडक्या जागेची असो नाहीतर सिबलच्या घरात.. अगदी प्रेमाच्या हॉस्पिटलच्या खोलीत.. सगळीकडे जाऊन आल्यासारखं वाटतं.. माझ्यासाठी वाचण्याचा हाच सगळ्यात मोठा आनंद आहे.. एका ठिकाणी बसून कुठे कुठे फिरून येता येत..


ह्याचाच एक दुसरा पैलू म्हणजे तुमची पात्र.. ‘My characters speak to me, I am never alone in my study, they're with me.. they demand to be written’ असं एकदा तुम्ही मला सांगितलं होतं. पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा तुमचा काही अंश शोधत होते तुमच्या पात्रांमध्ये.. पण कधी तल्लीन होऊन तुम्हाला विसरून पात्रांमध्ये अडकले कळलंच नाही.. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींचेही गुण त्यात दिसले.. SG गोखले.. मला भावलेलं एक पात्र.. केवळ अप्रतिम निर्मिती.. आशू सारखी बंडखोर वृत्तीची मुलगी तुम्हाला आवडते.. खूप सुंदर व्यक्तिमत्व.. तशीच उतरली आहे.. इतकंच कशाला.. प्रेमाची बायको.. एकदा आली ती कादंबरीत पण ती ज्या पद्धतीने चहा आणि डिव्होर्सबद्दल एका वाक्यात बोलते.. पाशीचा स्ट्रॉंगहेडेडपणा..


पात्रांमध्ये गुंतल्यावर हळूच एक धागा सापडत होता ज्याचं एक टोक मला तुमच्या हातात दिसत होतं.. मी शोधत नव्हते.. पण मला दिसत होतं.. पात्र आणि जागा जेव्हा वाचक अनुभवू शकतो, तोच लेखकाचा विजय असतो.. हो ना?


तुमचा खूप अभ्यास आहे ह्या कादंबरीमागे.. तमाम लेखकांचा असतोच.. पण मला जाणवला तो तुमचाच.. काहीकाही ठिकाणी तुम्ही काय विचार केला असेल हे अगदी सहज कळत होतं.. तर कधी ‘काय्ये ह्यांच्या डोक्यात?’ असा प्रश्न सतावत होता.. समोर बसून विचारावं असं वाटलं.. असं वाटणंसुद्धा भाग्यच.. which reader will have this liberty? To even think that I will speak about this particular character or plot to the writer himself?


शेवट पटला नाही… की रुचला नाही… की आवडला नाही.. नक्की माहीत नाही.. ह्या तिन्हीपैकी काहीच नाही खरंतर.. पण मनाला हलवून गेला.. तुमच्या शब्दात.. चिर पाडून गेला.. पाशीच जाणं, प्रेमाचं जाणं..आशू अजून स्ट्रॉंग होईल ह्यात तिळमात्र शंका नाही..पण प्रेमाचं आशूला अस्पर्श ठेवणं.. तरीही त्यांच्यातलं प्रेम..काय लिहू अजून? शेवटपर्यन्त बोलत राहणारी आशू.. जाणवली.. बस इतकंच..


इतके दिवस मराठी कादंबरी का वाचली नसेल मी? कारण ही मी वाचलेली पहिली आणि तुम्ही लिहिलेली पहिली कादंबरी had to make a mark. It will stay with me forever.


मुग्धा..
(Posted on 5/16/17)
वाचनीय आहे Review by Nisha
खूप आवडलं लेखन फार छान आहे (Posted on 3/17/16)

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter