Default welcome msg!

सरण - अक्षय वाटवे

हल्ली मी अशा काव्य कथांच्या प्रेमात पडू लागलो आहे...अक्षय हा आपल्या कुटुंबातला हरहुन्नरी गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. त्याचे लेखन....आता उमलू लागले आहे...

सरण - अक्षय वाटवे

दिवसाच्या पहिल्या प्रहरी का मन हे आतुर होई..? बहरात ऐन चैत्राचा कोकीळ विराणी गाई

ती काळोखी गूढ प्रभात मी क्षीतिज रेषा पाही तो पहाट वारा सुटतो ती पणती विझून जाई

दिवसाच्या पहिल्या प्रहरी ती स्मृती दाटूनी येई श्वासांची हरून लढाई तो आत्मा परतून जाई

किंचाळी फुटते हलकी तो धाय मोकलू पाही पण हुंदका ओठीचा ओठात विरुनी जाई

शून्यात लागले डोळे जागीच थिजून जाई उपचार सरावे पुढचे याचीच लागली घाई

कळवळे फोडी तो टाहो परतूनी येs गेs आई धगधगत्या सरणावरती ती राख होऊनी जाई

तो ओघळतो अश्रू गाली फडफडते ती नेत्र द्वयी भर ओसरतो आठवणींचा अवकाश मोकळे होई..