Default welcome msg!

Anuttarit Prashn - Kshitij Dharmadhikari

अफलातून गोष्ट....व्वा! स्वागत आहे क्षितीज धर्माधिकारी

अनुत्तरीत प्रश्न – क्षितीज धर्माधिकारी

आज वर्तमानपत्रात एक बातमी श्री. --------- यांचे निधन, वय ८४, त्यांच्या मागे बरेच आप्तेष्ट.

तसा ह्या व्यक्तीशी आपला कुठलाही संबंध नसतो. पण त्या व्यक्तीचे नाव माझ्या मेमरीमध्ये कायमचे घर करून बसलेलं. त्याचं अन त्याच्या पत्नीचं नाव..

सहा वर्षापूर्वी....

मी कोर्टात हजर असतांना एका केसचा पुकारा झाला. त्या केसमध्ये नियुक्त असलेले दोन्ही पक्षाचे वकील न्यायाधीशां पुढे हजार झाले. ती एक घटस्फोटाची केस होती. केसची सुरवात झाली अन मा. न्यायमूर्तीनी ने विचारले, “मुलामुलीचे वय काय?”

संबधीत वकिल, “मुलाचे ७८ व मुलीचे ७४ वर्षे. कोर्टात पेंगुळले वातावरण एकदम जागरूक झाले. न्यायाधीश महाराज जवळपास किंचाळून विचारतात, ‘काय ७८ व ७४ आणि या वयात विभक्त होण्यासाठी अर्ज? कुठल्या कारणासाठी?’

वकील, “एकमेकंशी पटत नाही”

न्यायाधीस: लग्नाला किती वर्षे झालीत

वकील: जवळपास ४९-५० वर्षे.

न्यायाधीस: मुलं?

वकील: दोन, एक मुलगा व एक मुलगी. विवाहित. दोघेही परदेशात. मुलगा सोफ्टवेयर इंजीनियर अमेरिकेत व मुलगी डॉक्टर लंडनला.

न्यायाधीश महाराजह फार विचलित झालेले दिसले. तेच काय? कोर्टात उपस्थित असलेल सगळेच जण.

न्यायाधीश: पटत नाही म्हणजे?

वकील: एकमेकांसोबत पटत नाही व सोबत राहयचे नाही. बस हेच कारण आहे.

न्यायाधीस:. प्रश्न- अहो या वयातच एकमेकांची गरज असते. ते काय आपल्या मुलांसोबत राहणार काय?

वकील-: नाही वेगळे व एकएकटे.

न्यायाधीश: हे दोन्ही वयस्कर एकेकटे कसे राहणार?

यावर वकिलाजवळ उत्तर नव्हते.

न्यायाधीस: दोन्ही पक्षकार हजर आहेत?

वकील: होय आहेत.

न्ययाधीश: त्यांना समोर बोलवा.

कोर्टात हजर असण्यार्यांच्या नजर मागे वळल्या. दोघेही हळूहळू पण दृढतेने न्यायाधीशांच्या समोर नम्रपणे उभे राहिले. बराच वेळ मा. न्यायधिशाना काय विचारावे सुचत नव्हते.

न्यायाधीश: तुम्ही विभक्त होण्याचा हा अर्ज सहमतीने दाखल केला?

दोघे: होय.

न्यायाधीश: या वयात?

दोघे: होय.

न्यायाधीश: कारण काय?

दोषे: एकमेकांशी पटत नाही.

न्य्याधीश: म्हणजे?

दोघे: एकमेकांना सहन करू शकत नाही.

न्यायाधीश: काही वाद?

दोघे: नाही.

न्यायाधीश: मग?

दोघे: पटत नाही.

न्यायाधीश: (वकिलांना) - ह्यां दोघांचे समुपदेशन झालं आहे का?

वकील: होय त्याचा रिपोर्ट केसमध्ये लागलेला आहे.

कोर्टाने समुपदेशकाचा रिपोर्ट वाचला. तो फक्त अर्ध्या पानाचा होता. रिपोर्ट वाचल्यानंतर विचारले की तुम्हा दोघांमध्ये काही तडजोड होऊ शकत नाही काय? दोघांचेही ठाम उत्तर- नाही आतापर्यंत तडजोडीनेच सोबत होतो.

न्यायाधीश: तुम्हाला असे नाही वाटत की या वयात तुम्हाला एकमेकांची गरज आहे?

दोघे: नाही.

न्यायाधीश: आपण तुमच्या तडजोडी साठी अजून प्रयत्न करू या का? तुम्ही मधल्या सुट्टीनंतर माझ्या चेबंरमध्ये २.३० वाजता आपआपल्या वकिलांसोबत या.

वकील: त्याचा काही उपयोग होणार नाही तरी मा. न्यायाधीश आदेश देत असतील तर येतो.

चेंबर मध्ये बोलणी झालीला. त्यानंतर मा. न्यायाधीशांनी कोर्टात येऊन त्या केसमध्ये आदेश पारीत केला व दोन्ही पक्षाच्या सहमतीने त्यांना विभक्त होण्याची मंजुरी दिली.

सहा वर्षानंतर

आज त्याच्या निधनाची बातमी वाचल्यानतंर अनेक प्रश्न घर करून गेले. ते दोघेही उच्च्शिक्षित. दोघेही उच्च्पादावरुन निवृत्त झालेले. आर्थिक बाजू एकदम भक्कम. त्यांची दोन्ही अपत्ये उच्चशिक्षित व लग्न होऊन सेटल झालेली. असे अगदी दृष्ट लागण्यासारखी परिस्थिती तरी म्हातारपणी विभक्त होण्याचा निर्णय?

दोन्ही पक्षाचे वकील माझे मित्रच. खर तर आम्ही एकमेकांच्या केसेसबाबत कधी विचारणा करीत नाही तरी कुतूहल म्हणून मी त्यावेळी त्यांच्या विभक्त होण्याचे कारणे जाणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वकिलांनी उत्तरे दिली ते दोघेही एकमेकांना सहन करू शकत नव्हते बस हेच कारण.

माझे मन सुन्न झाले.

नवरा बायकोचे का पटत नाही हे त्यांना सुद्धा बऱ्याचदा कळत नाही...

मी कोण?