Default welcome msg!

विशेष – मेघा निकम

कथेला शेवट अनपेक्षित असेल तर ती जास्त जवळ येते..ह्यात शंका नाही.

विशेष – मेघा निकम

उच्चवर्णीय, उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या सोसायटीमध्ये एकटीच राहताना अनेकदा तिला येता जाता पाहणाऱ्या वासनेने वखवखलेल्या नजरा दिसत होत्या. महिनाभरासाठी त्या गावात शैक्षणिक प्रकल्पासाठी राहणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने तिला एक रिकामी खोली देण्यात आली होती. काम संपवून संध्याकाळी त्या सोसायटीमध्ये जाताना तिला ब्रम्हांड आठवायचे. परक्या गावात स्थानिक अन् त्यात 'पुढारी' लोकांविरुद्ध आवाज उठवणे सोप्पी गोष्ट नव्हती. त्यामुळे तिला आता दुसरा आसरा शोधणे भाग होते.

गावातील दुसऱ्या भागात राहणारे मजूर लोक, सगळे रोज रात्री दारू पिऊन तर्र असायचे. नशेत असतील तर कोणाही स्त्री वर हात टाकतील अन् भांडण झाले तर कुऱ्हाडीने समोरच्याचा जीव घेतील अशा गोष्टी ऐकून होती ती. बरं, तिचे काम पण याच मजूर लोकांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे होते. म्हणून मुलांकरवी तिने आसरा मिळवण्यासाठी शोध सुरु केला. चार दिवसांची ओळख असलेल्या मुलीला घरात ठेवण्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार होईना. तर कोणी आपल्या नवऱ्याचे नाहीतर मुलाचे 'गुण' ओळखून असल्याने 'आमच्याकडे नको' म्हणाले.

....शेवटी एका आजी-नातवाच्या घरी ती पंधरा दिवस 'सुरक्षित आणि निर्धास्त' राहिली.

आजीचा बावीस वर्षाचा नातू "विशेष" मुलगा होता, ज्याला गावातील इतर जाणते लोक "एबनॉर्मल" म्हणून ओळखत.