30.00 58.00
Download Bookhungama App

हाश् हुश् ठ्ठाळ ठुश् - विभावरी देशपांडे

Description:

हे बालनाट्य सर्वसामान्य संकल्पनेहून वेगळे आहे. ‘ग्रिप्स थिएटरजर्मनी ह्या संस्थेच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन ह्या नाटकाचे लेखन केलेले आहेप्रकाशनाच्या निमित्ताने

अवघी सात वर्षांची असताना माझी ग्रिप्स थिएटरच्या अद्भुत दुनियेशी ओळख झालीछान छोटे वाईट्ट मोठेह्या नाटकाच्या निमित्ताने. तेव्हापासून आजपर्यंत मी ग्रिप्स थिएटरचा हात धरूनच घडत गेले. प्रेक्षक ते अभिनेत्री हा प्रवास ओघाने झाला पण अभिनेत्री ते लेखिका हा माझा प्रवास मला विशेष आनंददायी वाटतो.

एका मुंबई-पुणे प्रवासात श्रीरंगशी झालेल्या गप्पांच्या ओघात ह्या प्रवासाची सुरुवात झाली. ‘ग्रिप्सला आता नवे, ताज्या दमाचे लेखक, दिग्दर्शक हवेतअसे श्रीरंग म्हणाला. ‘नाटक कोण लिहिणार?’ ह्या माझ्या प्रश्नावरतूच का लिहीत नाहीस?’ असा प्रतिप्रश्न त्याने मला विचारला. त्या वेळी ही कल्पना मी हसण्यावारी नेली असली तरी माझ्या डोक्यातून ती गेली नाही. त्या वेळी श्रीरंगकडे फोल्कर लुडविग लिखतबेला, बॉस अॅण्ड बुलीह्या जर्मन नाटकाची संहिता होती. मी ती वाचली आणि श्रीरंगच्या मदतीने ते नाटक मराठीत रूपांतरित केले.

पालक आणि मुलांमधील विसंवादामुळे किंवा संवादाच्या अभावामुळे ह्या नाटकातील मुले काही समाजविघातक प्रवृत्तींना बळी पडतात. मोठ्यांपासून ही गोष्ट लपवताना आपल्या अजाणपणाने ते ह्या प्रवृत्तींच्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत जातात. अखेर हे संकट टळते पण पालक आणि मुलांमधल्या संवादाची गरज अधोरेखित करूनच.

पालक-मुलांतील विसंवाद कुठल्या प्रकारचा आणि कोणत्या कारणाने असू शकतो हे ह्या नाटकात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही तीनही मुले तीन वेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातली आहेत आणि त्यांचा आपापल्या पालकांशी असलेला विसंवादाचा सूर, वेगवेगळ्या कारणांनी का होईना, एकसारखाच आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आजूबाजूचे वातावरण ह्या विसंवादाला पोषकच आहे. अशा वेळी मुलांना आईवडिलांशी सुसंवाद साधण्यामागची गरज आणि त्याचे फायदे ह्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांनी विशेष प्रयत्नांनी अशा प्रकारचा सुसंवाद मुलांना साधता यावा ह्यासाठी विश्वास निर्माण करण्याचे जागरूक प्रयत्न करावेत असे दोन हेतू हे नाटक लिहिण्यामागे आहेत.

 

विभावरी देशपांडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि