100.00 250.00
Download Bookhungama App

गाजलेल्या प्रस्तावना - वि. ग. कानिटकर

Description:

वासुदेवशास्त्री खरे, इतिहाससंशोधक शेजवलकर, न. चिं. केळकर, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर व डॉ. स. गं. मालशे या मान्यवरांनी विविध विषयांवरील लेखनाला लिहिलेल्या व मात्त्वपूर्ण ठरून गाजलेल्या प्रस्तावना, या पुस्तकात प्रथमच एकत्र समाविष्ट आहेत.ग्रंथांचे स्वरूप व लेखनामागील हेतू, वाचकांना विषय प्रवेशापूर्वीच कळावा, यासाठी बहुधा प्रास्ताविके लिहिली जातात. परंतु मराठी साहित्यांत अनेकदा असे घडले आहे की मूलगामी असे विचार व्यक्त करणारी ग्रंथाची प्रस्तावनाच अतिशय प्रभावी व महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. प्रस्तावना लेखक हा, स्वतः ग्रंथकर्ताच नसेल, तर तो सामान्यतः विद्वत्तेने म्हणा, व्यासंगाने म्हणा किंवा साहित्यिक कर्तृत्वाने म्हणा, ज्येष्ठ असतो. यामुळे काहीवेळा अशांची प्रस्तावना हीच त्या पुस्तकाचा एक बहुमोल अलंकार ठरते. स्वतःच संशोधित केलेल्या 'राधामाधवविलासचंपू' या शहाजीराजांच्या चरित्र पोथीला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना, हीच महत्त्वपूर्ण ठरली यात नवल नाही. मॅझिनी चरित्राला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी जोडलेली प्रस्तावना, ही तर एक अमर स्वातंत्र्यसूक्तच आहे. या दोन्ही प्रस्तावनांबरोबर, वासुदेवशास्त्री खरे, इतिहाससंशोधक शेजवलकर, न. चिं. केळकर, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर व डॉ. स. गं. मालशे या मान्यवरांनी विविध विषयांवरील लेखनाला लिहिलेल्या व मात्त्वपूर्ण ठरून गाजलेल्या प्रस्तावना, या पुस्तकात प्रथमच एकत्र समाविष्ट आहेत. मराठी साहित्याच्या अभ्यासकांच्या व ग्रंथप्रेमींच्या संग्रही असायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि