30.00 58.00
Download Bookhungama App

फ्रँक वॉरेल - वि. ग. कानिटकर

Description:

फलंदाजीत किंवा गोलंदाजीत मोठमोठे पराक्रम करून ख्याती पावलेले खेळाडू अनेक असले तरी विशेष कांही सांगावे असे नाट्य फारच थोड्यांच्या बाबतीत घडतेक्रिकेटक्षेत्रात प्रत्येक दशकात अनेक नाणावलेले खेळाडू देशोदेशी निर्माण होतात. फलंदाजीत किंवा गोलंदाजीत मोठमोठे पराक्रम करून ख्याती पावलेले खेळाडू अनेक असले तरी विशेष कांही सांगावे असे नाट्य फारच थोड्यांच्या बाबतीत घडते. स्वतःच्या खेळाबरोबर आपल्या देशातील खेळाची मान सतत उंच ठेवण्यात तर फार थोड्यांना यश लाभते. ह्याकरिता काही आग्रह धरावे लागतात. प्रत्यक्ष क्रीडांगणावर खेळण्यासाठी खेळ खेळावा आणि क्रीडांगणाबाहेरील व्यवहारात आपल्यावरील सामाजिक नात्यांचे भान सुटू नये ही किमया वॉरेलच्या क्रिकेटजीवनात मला प्रकर्षाने जाणवली. हे कथन वाचताना याचा प्रत्यय वाचकांनाही येईल.

वॉरेलच्या क्रिकेट क्षेत्रामधील कर्तृत्वाचे हे निवेदन मी आत्मनिवेदनाच्या पद्धतीने लिहिले आहे. वॉरेलसंबंधी इतरांनी जे विपुल लिहिले आहे व स्वतः वॉरेलने त्याला महत्त्वाचे वाटणारे असे जे विचार लिहून ठेवले आहेत त्याचा उपयोग झाल्यामुळे हे कथन आत्मनिवेदनाच्या पद्धतीने लिहिता आले. असे करताना अर्थातच काही मुभा मला घ्याव्या लागल्या आहेत. अशी मुभा घेताना मी एकच काळजी घेतली आहे की, वॉरेलच्या तोंडी ज्या घटना सत्य व अविवाद्य आहेत तेवढ्याच मी घातल्या आहेत. जी स्वतःची मते म्हणून त्याने व्यक्त केलेली या कथनात आढळतील त्या सर्वांना त्याच्याच निवेदनाचा भरपूर आधार आहे. फ्रँक वॉरेल हा पुरेसाफ्रँक’ (मनमोकळा) नसता तर त्याने कदाचित स्वतःसंबंधी लिहिले नसते, आणि हे आत्मकथनही मला तयार करता आले नसते.

 

वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि