10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - जानेवारी २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा जयंत पोंक्षे यांचा विशेष लेख “२०१८ मधील लक्षवेधक चित्रपट” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'सोहळा'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...संपादकीय

सस्नेह नमस्कार,

बुकहंगामाच्या सर्व कुटुंबियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धीचे आणि सहिष्णुतेचे जावो.

आता मकरसंक्रांतीचेही वेध लागले आहेत. तेंव्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि सत्य बोला.

नवीन वर्षात पदार्पण करताना मागील वर्षाचे सिंहावलोकनकरून, मागील वर्षातील घडामोडींचा धांडोळा घ्यावा. याच विचाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट क्षेत्रात काय वेगवेगळे प्रयोग झाले याचा धांडोळा आम्ही या अंकात घेण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळचा विशेष लेख जरूर वाचा “२०१८ मधील लक्षवेधक चित्रपट”.

या महिन्याचे बुकहंगामा शिफारस मधील पुस्तक आहे मंजुषा अनिल लिखित “सोहळा”.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

- संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि