10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - डिसेंबर २०१८ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा फलज्योतिष या विषयावर निखळबुद्धिवादी विचार मांडणारा दि य कानविंदे यांचा विशेष लेख “फलज्योतिष - एक दृष्टिकोण” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'एक शोध 'त्या'चा'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...

 संपादकीय

मित्रहो,

सस्नेह नमस्कार.

बघता बघता वर्ष संपत आले. काही दिवसातच नवीन वर्ष सुरु होईल. आपण सगळे नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले असालच. अगदी सरत्या वर्षातील कडू आठवणी बाजूला सारून आणि गोड आठवणींची उजळणी करत. नवीन वर्षाचे स्वागत तर करायलाच हवे. पण ते करीत असतानाच जुन्या वर्षात केलेल्या चुका समजून घेऊन त्या कशा टाळता येतील याचाही विचार व्हावा. नवीन वर्षा सोबत नवीन विचारही यावा. असा विचार जो आपली दृष्टी अधिक निकोप करेल, आपल्याला एक उत्तम “माणूस” बनवेल.

याच उद्देशाने या अंकात फलज्योतिष या विषयावर निखळबुद्धिवादी विचार मांडणारा दि य कानविंदे यांचा विशेष लेख देत आहोत “फलज्योतिष - एक दृष्टिकोण”.

यावेळी बुकहंगामा शिफारस आहे सचिन मणेरीकर यांचे बहुचर्चित पुस्तक “एक शोध 'त्या'चा”.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि