10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड... मस्तीची पाठशाला मार्च २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा  विशेष लेख "पंडिता रमाबाई आणि ताराबाई मोडक या महान स्त्रियांचा परिचय” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस गौरव नायगावकर लिखित "पार्टनर". त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...संपादकीय

मित्रहो, १६ आणि १७ फेब्रुवारीला नुक्कड साहित्य संमेलन नागपूर येथे दणक्यात साजरे झाले. आपल्यापैकी काही जणांना इच्छा असूनसुद्धा संमेलनास येणे जमले नाही. हरकत नाही. पण पुढल्या वर्षी नक्की जमवा. तुमच्यासाठी संमेलनाचा संक्षिप्त वृत्तांत या अंकात देत आहोतच.

८ मार्च हा महिला दिन. या निमित्ताने यावेळच्या विशेष लेखात पंडिता रमाबाई आणि ताराबाई मोडक या महान स्त्रियांचा परिचय करून देत आहोत.

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये “पार्टनर” याबहुचर्चित पुस्तकाची ओळख करून दिली आहे.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि