10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड : मस्तीची पाठशाळा जून 2018 - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा चंद्रकांत मेहेंदळे लिखित लेख 'स्वयंभू रंगकर्मी : विनय आपटे', डॉ. सुनील अणावकर यांची कथा आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'माझ्या पिलांच्या बाबास. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...संपादकीय

दोस्तहो,

FC रोडच्या नवीन स्वरूपाच्या घोषणेचे आपण जे स्वागत केलेत त्याने आमचाही उत्साह दुणावला आहे. आता विविध विषयांवर आपण आपले साहित्य कधीही पाठवू शकता. यासंबंधी अधिक माहिती या अंकात दिली आहेच. आता तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

FC रोड प्रमाणेच नुक्कड, मिशी, एक पान कवितेचे, आणि लिहिलेली पत्रे ही बुक हंगामाने सर्व लेखकांसाठी उपलब्ध करून दिलेली व्यासपीठे. या विविध व्यासपीठांवरील विविध लेखक, कवींच्या उत्तम उत्तम कलाकृतींची ओळख FC रोडच्या वाचकांना व्हावी म्हणून या सर्व व्यासपीठांवरील या महिन्यातील एक एक उत्तम लेखन FC रोडच्या अंकात समाविष्ट करीत आहोत. विविध आकृतिबंधातील हे लेखन आपणास निश्चितच आवडेल.

मराठी रंगभूमीवरील एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे विनय आपटे. १६ जून हा विनयाचा जन्मदिन. दुर्दैवाने आता आपल्या सोबत आहेत त्या फक्त विनयच्या आणि त्याने दिलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम नाटकांच्या आठवणी. त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनय आणि त्याच्या नाटकांवर खासलेख FC रोडसाठी लिहीला आहे; विनयच्या नाट्य सृष्टीतील पहिल्या पावला पासून त्याचे साथी असलेले, विनयचे घनिष्ठ मित्र, त्याच्यागणरंगनाट्यसंस्थेचे प्रमुख आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते दिग्दर्शक श्री. चंद्रकांत मेहेंदळे यांनी.

याशिवाय कथा, कविता, ललितबंध असे विविध साहित्य प्रकार आहेतच.

हा अंक आपणास आवडेल ही खात्री आहेच.

- संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि