10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड... मस्तीची पाठशाला फेब्रुवारी २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा जयंत पोंक्षे यांचा विशेष लेख “२०१८ मधील लक्षवेधक एकांकिका” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस दि. य. कानविंदे लिखित "चिंतनिका". त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...

 संपादकीय

सस्नेह नमस्कार,

हा फेब्रुवारी महिना असल्याने सर्वजण व्हॅलेंटाईन डे साजरा करतीलच. नाही, तो कराच! पण १४ फेबृवारीप्रमाणे २८ फेब्रुवारी सुद्धा विसरू नका.

२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. या निमित्ताने या महिन्यात आम्ही विज्ञानवादी आणि विवेकवादी चिकित्सेची परंपरा पुढे चालू ठेवणाऱ्या एका पुस्तकाची ओळख करून देत आहोत. या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये वाचा दि. य. कानविंदे यांच्या "चिंतनिका" या पुस्तकाविषयी.

आणि हो, १६ फेब्रुवारी लक्षात आहे ना? आपल नुक्कड साहित्य संमेलन आहे नागपूरला. १६ आणि १७ फेबुवारीला. येताय ना? विवध गटातील नॉमिनेशन जाहीर झाली आहेत अगदी FC Road ची सुद्धा. 

असो!

गेल्या महिन्यात आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट क्षेत्रात काय वेगवेगळे प्रयोग झाले याचा धांडोळा घेतला. तर या महिन्यात महाराष्ट्र्राचा अभिमान असणाऱ्या रंगभूमी संदर्भात एक विशेष लेख देत आहोत. मराठी रंगभूमीची प्रयोगशाळा म्हणून ज्या एकांकिका स्पर्धांकडे पाहिले जाते त्या युवा रंगकर्मींच्या २०१८ मधील एकांकिकांचा आढावा घेणारा विशेष लेख जरूर वाचा “२०१८ मधील लक्षवेधक एकांकिका”.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि