100.00 250.00
Download Bookhungama App

धर्म: महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा - संकलन । संपादन : वि. ग. कानिटकर

Description:

दोघांचे धर्मविषयक विचार व निदाने शंभर टक्के परस्परपूरकच असूनहीदृष्टिकोणातील फरकामुळे तपशिलात जी भिन्नता आली आहे ती अशा पुस्तकाच्या वाचनाने सुस्पष्ट होण्यास मदत होईलसे वाटते.मनोगत

महात्मा गांधी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याच शब्दांचे हे पुस्तक आहे. या प्रकारचे विविध वादग्रस्त विषयावरचे दोघांचे विचार समोरासमोर ठेवणारे संकलन तयार करण्याचे माझ्या मनात आले याची करणे तीन.

एक म. गांधीचे बहुसंख्य चाहते स्वा. सावरकरांचे विचार अस्पर्श मानतात व स्वा. सावरकरांचे भक्त, मूळ गांधी-विचारबहुधा वाचत नाहीत. परस्परांच्या खंडण - मंडणातून जो काय त्यांच्या विचारांचा बोध होतो, तेवढाच त्यांना माहीत असतो.

दुसरी गोष्ट प्रत्यक्षात दोघांचे धर्मविषयक विचार व निदाने शंभर टक्के परस्परपूरकच असूनही, दृष्टिकोणातील फरकामुळे तपशिलात जी भिन्नता आली आहे ती अशा पुस्तकाच्या वाचनाने सुस्पष्ट होण्यास मदत होईलसे वाटते.

तिसरी महत्त्वाची गोष्ट, इतिहासच बदलू पाहणारे राजकारणी आणि इतिहासलेखक, गांधी असे म्हणणे शक्यच नाही, सावरकर असे म्हणल्याचे वाचनात नाही, अशी गोलमाल विधाने ठासून करतात. अशाची संदर्भासहितसोयअथवागैरसोयअशा पुस्तकाने होईल. हे पुस्तक तयार करताना, माझे सावरकरप्रेमी स्नेही, श्री. श्री. . जोशी यांच्या ग्रंथभांडाराचा, त्यांनी मला मुक्त वापर करून दिला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तकाची कल्पना मी प्रथम मांडली तेव्हा ती श्री. रवि बेहेरे यांना आवडली.

यामुळेप्रकाशक कोण?’ हा पुस्तक तयार झाल्यानंतर पुढे येणारा प्रश्न आधीच सुटला. यामुळेच वाचकांना पुस्तक त्वरित उपलब्ध झाले आहे.

- वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि