100 174
Download Bookhungama App

धांडोळा - विक्रम भागवत

Description:

आतंकवादा विरुध्द लढणाऱ्या ए टी एस ओफिसिरची शोकांतिका Tragedy of upright ATS officer who puts up a fight against terrorismप्रकाशकाचे मनोगत धांडोळा ही विक्रम भागवतांची पहिलीच कादंबरी. २०१२ मध्ये त्यांनी ही कादंबरी लिहिली आणि २०१३ मध्ये ई-साहित्य प्रतिष्ठान ने ती ई-बुक म्हणून प्रसिद्ध केली. प्रसिद्धीची संकल्पना सुद्धा आगळी वेगळी अशी होती. सुरुवातीला तिचे फक्त पहिले प्रकरण प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यांना हे पहिले प्रकरण वाचून संपूर्ण कादंबरी वाचायची इच्छा असेल त्यांनी विक्रम भागवत ह्यांच्या कडे त्या कादंबरीची ई-प्रत मिळण्याची विनंती नोंदवावी असे जाहीर करण्यात आले. जवळ पास २२०० वाचकांनी अशी मागणी त्यांच्या कडे नोंदवली..केवळ २ महिन्यांच्या कालावधीत. ह्या कादंबरीची नोंद सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स सारख्या लोकप्रिय दैनिकांनी सुद्धा घेतली हे विशेष. ही कादंबरी वाचल्यावर सुप्रसिद्ध अभिनेते आणि एक सुजाण वाचक सुरेश भागवत ह्यांनी असे म्हटले होते की ही एक बंडखोर व्यक्तिरेखांची कादंबरी आहे. आणि ते खरेच आहे. सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेमधील दांभिकपणा विरुद्ध ह्या कादंबरीमधील सर्वच व्यक्तिरेखा आपापल्यापरीने उभ्या राहतात. प्रमुख व्यक्तिरेखांच्या निवेदनातून ही कादंबरी अत्यंत झपाट्याने पुढे जाते. तो वेग इतका असतो की कादंबरी संपवल्या खेरीज खाली ठेवता येऊ नये.  काही पात्रांच्या तोंडी असलेली शिवराळ भाषेवर  आक्षेप येतील की काय अशी सुरुवातीला आशंका होती. भागवत आपल्या व्यक्तिरेखांच्या भाषेवर ठाम होते.  त्यांचे म्हणणे होते की व्यक्तिरेखांनी त्यांची भाषा बोलणे आवश्यक असते नाहीतर त्या वाचकाला खऱ्या वाटत नाहीत. पण बहुसंख्य वाचकांनी संपूर्ण कादंबरीचे आणि व्यक्तिरेखांच्या भाषेचे समर्थनच केले. प्रेमानंद हिर्लेकर हा एटीएस ऑफिसर आणि पत्रकार आशु काळसेकर ह्या दोन प्रमुख व्य्क्तीरेखांच्या माध्यमातून ह्या  कादंबरीमधील संघर्ष उभा रहातो. हा संघर्ष ह्या दोन व्यक्तिरेखांचा नाही तर त्यांना उभे आडवे छेद देणाऱ्या...त्यांच्या आयुष्यातील इतर व्यक्तिरेखांचा सुद्धा आहे. प्रसिद्ध समीक्षक श्रीनिवास हवालदार ह्यांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे ही कादंबरी मराठी कादंबरीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल ह्या विश्वासाने सृजन ती पुन्हा प्रकाशित करीत आहे.   सृजन


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि