Id SKU Name Cover Mp3
dakhkhancha-birbal-tenaliram-yachya-chatury-katha


60 100
Download Bookhungama App

दख्खनचा बिरबल तेनालीराम याच्या चातुर्य-कथा - मधुकर सदाशिव घोलप

Description:

पूर्वी राजा-महाराजांच्या पदरी अनेक गुणवान माणसे असत. चतुर, विनोदी व हजरजबाबी अशी एखादी तरी व्यक्ती ह्या राजेलोकांच्या पदरी असायचीच. अकबराच्या पदरी असलेला बिरबल, काश्मीरच्या राजाच्या आश्रयात असलेला विल्हण ही नावे आपल्या चांगल्याच परिचयाची झालेली आहेत. तेनालीराम हा त्यांच्याच माळेतील एक हिरा होय. विजयनगरचा राजा कृष्णदेव तथा रायर याचा हा आश्रित.प्रास्ताविक

पूर्वी राजा-महाराजांच्या पदरी अनेक गुणवान माणसे असत. चतुर, विनोदी व हजरजबाबी अशी एखादी तरी व्यक्ती ह्या राजेलोकांच्या पदरी असायचीच. अकबराच्या पदरी असलेला बिरबल, काश्मीरच्या राजाच्या आश्रयात असलेला विल्हण ही नावे आपल्या चांगल्याच परिचयाची झालेली आहेत. तेनालीराम हा त्यांच्याच माळेतील एक हिरा होय. विजयनगरचा राजा कृष्णदेव तथा रायर याचा हा आश्रित.

केवळ गमतीदार विनोद करून राजाला खुश करणे व इतरांना हसवणं एवढंच याचं काम नसे. दरबारात कोणत्या वेळी काय प्रसंग निर्माण होईल. तसेच राजा कोणता प्रश्न विचारील वा कोणती कामगिरी अचानकपणे सोपवील याचा नेम नसे. अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी व त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी तसेच सोपविलेली कामगिरी चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यासाठी तसेच अंगी प्रसंगावधान, चातुर्य, तरल बुद्धिमत्ता व विलक्षण हजरजबाबीपणा असावयास हवा. नाहीतर येऱ्यागबाळ्या विदूषकाचा दरबारी निभाव लागणे कठीण मग राजाश्रय कोठला टिकायला ? पण जर ती व्यक्ती वरील गुणांनी युक्त असेल तर राजाच्या दरबारी त्याला मोठा मानसन्मान मिळे. राजा त्याला आपला मित्र म्हणत असे. राजदरबारात काय, पण राजवाड्यात अगदी राणीच्या महालापर्यंतसुद्धा त्याला वावरण्याची मोकळीक असे. वेळप्रसंगी तो राजाचीसुद्धा थट्टा करू शकत असे.

तेनालीराम असाच गुणवान, बुद्धिवान, चतुर व विनोदी होता. म्हणूनच विजयनगरचा राजा कृष्णदेव याने त्यास आपल्या पदरी ठेवले होते. कृष्णदेव राजा गुणीजनांचा मोठा चाहता होता. त्याचे दुसरे नाव रायर. इसवी सन १६ व्या शतकाच्या प्रारंभी हा राजा राज्य करीत होता.

एका प्रसंगी तेनालीरामाचे बुद्धिचातुर्य रायर राजाच्या नजरेस आले. त्यानंतर तेनालीरामाला त्याने पदरी ठेवून घेतले. राजा कृष्णदेवाने त्यास खूपच स्वातंत्र्य व मोकळीक दिली होती.

तेनालीरामाच्या विनोदाच्या आणि चातुर्याच्या पुष्कळ आख्यायिका दक्षिण भारतात प्रसिद्ध आहेत.


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)