Id SKU Name Cover Mp3
Bena


30.00 58.00
Download Bookhungama App

बेणं - विष्णु गुंजाळ

Description:

बेणं - ले. विष्णु गुंजाळ

  ...शेलाऱ्या बैल इकला तशी मला कळच निघंना. जिथं फुलं येचली तिथं गवऱ्या येचायच्या...

शेलाऱ्या बैल आत्ता इकला.

मन्यामामा मेला तशी औकळाच आली घराला. औकळा म्हंजी चालतं औतच खुटलं.

एकएका माणसाचा पायगुन असतो! माणसाचा पायगुन? जनावराचा म्हन्‌... जनावराचा म्हन्‌, माणसाचा म्हन...

अरे, एखादं जनावर गोठ्यात आलं का सुपडं साफ होतं! नवा गोऱ्हा गोठ्यात आला तशी जाती पाळीच आली मन्या मामाला.

मागच्या चैतीला तर घेतला नवा गोऱ्हा मन्यामामानं. तो गोऱ्हा कोणाचा हाये?

बाबू चासकराचा!

काय झाल बाबूचं?

वाट लागली पार!

त्याच्या आधी तुला सांगतो, पवळ्याचा गाडा ऐकून माहिती असंल?

मुखईचे पवळे?

काय झालं पवळ्याचं?

धुळधान झाली घरादाराची. तो गोऱ्हा मन्यामामानं घेतला. पर्वाच्या दिशी मन्यामामानं तो गोऱ्हा जित्ता पहारला!

खरं का काय?

नंबर एकचा पळणारा बैल पन मन्यामामानं जित्ता मारला. धुळधान केली त्या बैलानं मन्यामामाची. सकाळी मन्यामामाचा पोऱ्या, तो रे घारा? उभा चिरला त्या बैलानं. गव्हानीत वैरन सामोरी करायला म्हणून गडी गेला तसं शिंगच खुपसलं पोटात, जागच्या जागी डेडूळ बाहेर काढलं.

अग बाबो, मंग?

वैतागानं मन्यामामानं मागचा- मोहरचा इचार करावा का? आता एकुलता एक पोरगा. वंशाचा दिवा. त्यात गडी बैलबारदान्यात गुरफाटलेला. भारी नादी. गाड्या- बैलांचा शौकी. या बैलापायी सतरा खिल्लारे बदलले पोरानं, पन त्याला काही जोड मिळाली नाही ती नाहीच! असा जबरा पळणारा. पण, पोरगा चिरला म्हणल्यावर करतो काय!

सकाळी ह्या बैलाला गाडीला बांधून मन्यामामानं त्याला पिंजरखोरीत नेला. आता पिंजरखोरी तुला माहिती आहेच. दहा-पंधरा परस तुटलेला कडा, नि खाली मरणाची खोल काळदरी! बैलाला सोताच्या हातानं मन्यामामानं दरीत डांबलेला. बैलगाडी लांब रस्त्याला उभी केलेली. वर पहाडावर जाऊन चार गड्याला हलणार नाही असा दगड मन्यामामानं पहारीनं हलवलेला, नि सोडला नेमका दरीत, बैलाच्या शिंगाडात. बैलानं जिवाच्या आकान्तानं हंबरून दरी घुमवलेली. परत म्हणून मन्यामामानं मागं वळून पाहिलं नाही. तडक गाडी घेऊन गडी घरी आलेला. पाच हजारांचा खिल्याऱ्या, जबरा पळणारा, कुत्र्याच्या मौतीनं मन्यामामानं त्याला मारलेला. खिल्याऱ्या पहारला आन दुसऱ्या दिवशी गड्यानं शेलाऱ्या बैलाचा बाजार केलेला! शेलाऱ्या इकला तसं माझं मनच उडालं. आन मी चाकरीला राजीनामा दिलेला.

मंग आता तुझा काय इचार हाये?

जलमभर चाकरीच करायची कुणाची तरी!

राहा मंग तू आमच्या इथं. गुराढोराचं तुला याड हायेच. मलाही असाच मानूस पाहिजे होता. आता तू मोठ्या घरचा गडी. माझा आपला हा फाटका संसार. जमत असलं तर राहा.

आप्पा, कशाला खपली काढतोस! ते दिवस आता परत येणार नाहीत. असा मालक पुढं व्हनार नाही. अशी चाकरीही व्हनार नाही. गड्याला चरवी-चरवी निरसं दूध प्यायला. बैलाला गव्हाचा चिक खायला. ह्या ह्या हाताचा अजून वास गेला नाही तुपाचा. तुमच्या डोळ्यादेखतच्या गोष्टी! लई इस्वास माणसाला. लई इस्वास. मन्यामामाच्या अमदानीत भरपेट खाल्लं आप्पा.

जीव निधावला आता.

तवा पैसाही गंज मिळायचा.

गंज पैसा आताही मिळन पन खर्चायची अक्कल नको? मानूस उमदा होता. इस्वास व्हता. हातात पैसा खेळत व्हता. येतं किती, जातं किती याची मोजदाद नव्हती. मन्यामामा मुंबईला आन खारकाखोबऱ्याची पोती बैलांच्या मांडवात नाही रे! सव्वाशे भाराचा तोडा होता या पायात. लक्ष्मी येती म्हंजी उगीच येत नाही. गावचा पन्नास मानूस होता गाड्यामागं. उगीच नाही जीवावर उदार होऊन आम्ही चाकऱ्या घातल्या. बायको, पोरं, घरदार, कधी आठवू दिलं नाही मानसानं. घरी येईन तव्हा खैरात व्हायची आमच्यावर. उगीच मरत नव्हतो आम्ही! का वेडं होतो? शेलाऱ्या बैल म्हंजी नाक व्हतं मन्यामामाचं.

तुझी कापडचोपड कुठं हायेत?

कुठं हाये पत्त्या माझा ठिकाणावर?

बायका- पोरं?

बायकू माझी मंबईला असते भावाच्या जवळ!

तू इथं बायकू तिथं!

इथं आनून करू काय?

का?

ती यायला नको? तिच्या भावांना खानावळ कोन घालील? ढीग बायको आहे,


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि