60.00 116.00
Download Bookhungama App

अर्धसत्य - सर्वोत्तम सताळकर

Description:

आजच्या आधुनिक जगातील सामाजिक परिस्थिती, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण करणाऱ्या या कथा आहेत. सामाजिक आंदोलने, दहशतवाद, आधुनिक स्त्री-पुरुष संबंध असे सद्यकालीन विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. काही कथा शेवटच्या अनपेक्षित कलाटणीने वाचकांना स्तिमित करतील, तर काही जीवनाचे गहिरे दर्शन घडवतील. वाचकांना उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देऊन मनोरंजन करणाऱ्या त्याचवेळी आजच्या आधुनिक जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाचे दर्शन घडवणाऱ्या या कथा वाचकांना निश्चितच आवडतील.या कथेतील पात्रे, स्थळे आणि प्रसंग काल्पनिक आहेत असे लेखक नेहमी कथेच्या शेवटी लिहितो. अर्थात ते एका अर्थाने खरेही असते. कारण कथेतील पात्रांची नावे, प्रसंग वगैरे लेखक आपल्या कल्पनेनेच लिहितो. पण रहस्यकथा, गूढकथा, साहसकथा अशा विशिष्ट प्रकारच्या कथांचा अपवाद सोडला तर ज्या कथा सामाजिक विषयावर असतात त्या मात्र पूर्णपणे काल्पनिक असत नाहीत. आजूबाजूचे सामाजिक वातावरण, घडणाऱ्या घटना, आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटणाऱ्या आणि दिसणाऱ्या व्यक्ती, सामाजिक विचारप्रवाह आणि रोज बदलत चाललेली जीवनमूल्ये याचे फार ठळक प्रतिबिंब कथेच्या आशयात दिसते. या संग्रहातील कथांबाबतही हेच म्हणता येईल. यातल्या काही कथा या सामाजिक, काही व्यक्तिनिष्ठ तर काही मानवी नातेसंबंधावर आधारित आहेत. मला आजूबाजूच्या वातावरणात जे सामाजिक वास्तव जाणवले त्याला मी यथाशक्ती चित्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे हे आता वाचकांनी ठरवायचे आहे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि