200 350
Download Bookhungama App

अ-लौकिक - शांता शेळके

Description:

‘अ-लौकिक’ हा शब्द या पुस्तकासाठी मी एका विशिष्ट अर्थाने वापरला आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत ज्यांनी अलौकिकत्व संपादन केले, अशा काही व्यक्तींची ही शब्दचित्रे आहेत. ज्या व्यक्ती सर्वसामान्य अर्थानेही अलौकिक आहेत - सम्राट नेपोलियन हा रणशूर पुरुषोत्तम, ग्रेटा गार्बो, जोन क्रॉफर्ड या रजतपटावरील अभिनयसत्राज्ञी, बालझाक, अ‍ॅगाथा ख्रिस्ती, मारियो पुझो यांनी साहित्यक्षेत्रात असामान्य यश संपादन केलेले. ही सर्व व्यक्तिमत्त्वे अलौकिकच म्हटली पाहिजेत. तथापि, अलौकिक हा शब्द आपण थोड्या वेगळ्या अर्थानेही वापरतो. लौकिक, पारंपरिक जीवनापेक्षा ज्या व्यक्ती काही वेगळे जीवन जगल्या, त्याही ‘अ-लौकिक’च म्हटल्या पाहिजेत. इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्यावर एक चमत्कारिक आणि गूढ असा अधिकार गाजवणारा कर्नल ब्राऊन, वयाच्या बाराव्या वर्षी किडनीच्या दुर्धर विकाराने जग सोडून गेलेली, पण आपल्या व्याधीचा निर्भयपणे स्वीकार करून आपल्या चिमुकल्या जीवनाला अर्थपूर्णता देणारी सू मेडमेंट, तसेच स्पेन्सर ट्रेसी व त्याची पत्नी हे दांपत्य, सहसंपादक मॅक्सवेल पर्किन्स ही मंडळीसुध्दा मला ‘अलौकिक’ वाटतात. जीवनसंग्रामात आपले शक्तिसर्वस्व वेचून लढत राहणारे हे आदरणीय कृतिशूर आहेत. म्हणून त्यांच्यावरील लेखांचाही मी या पुस्तकात समावेश केला आहे. - शांत शेळके.

अभिवाचन - शलाका आपटे
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि