100 150
Download Bookhungama App

अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी - वि. ग. कानिटकर

Description:

मरणाच्या छायेतील इव्हा - अॅडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी

'रविवार होता. हिटलरने उरली सुरली महत्त्वाची कामे उरकली... अखेरची लढाई देण्याची तयारी करावी या आदेशावर सही केली. हे होईपर्यंत पहाटेचे तीन वाजले. मग तो शयनगृहात गेला. 

इव्हा व अॅडॉल्फ यांच्या विवाहानंतरची ही दुसरीच रात्र होती... अखेरची रात्र होती. उजाडताच इव्हा अगोदर खोलीबाहेर आली.

तिने फ्राऊ जुंगला बोलावून घेतले. कपाटातला आपला रुपेरी केसाळ कातड्याचा फॉक्स कोट काढला व जुंग हिच्या अंगावर घालत ती म्हणाली, "फ्राऊ, ही माझी जातानाची भेट आहे. नाही म्हणू नको... " 

इव्हाने त्या मुलीला जवळ घेतले व पाठीवर थोपटीत म्हणाली, "इथून निसटण्याचा प्रयत्न कर... सुखरूप बाहेर पडलीस तर बव्हेरीयाला माझा नमस्कार सांगायला विसरू नकोस" जुंगला रडू कोसळले.'

मरणाच्या छायेतील इव्हा - अॅडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि