200 450
Download Bookhungama App

Sim Sim - Jui Kulkarni

Description:

आयुष्यात खूप कथा , कादंबर्‍या  वाचतो आपण . पण फार थोड्या कहाण्या  जीवाच्या जवळ येऊन बसतात. त्यातीलच ही एक आहे : 'सिमसिम'.

गीत चतुर्वेदी यांनी हिंदीत लिहलेली ही लघुकादंबरी जुई कुलकर्णी यांनी मराठीत अनुवादित केली आहे  . 

या कथेत माणसांच्या  निसटत जाणाऱ्या आयुष्याचे सगळे रंग आहेत . या कादंबरीत  अनेक वर्षांपूर्वी  देशाच्या फाळणीमुळे   उध्वस्त झालेल्या अधुर्या प्रेमकथेपासून आपण प्रवास करतो ते आत्ताच्या तीव्र स्पर्धेच्या मोबाईल आणि चॅटमय जगापर्यंत . श्रृंगाररसापासून ते हिंसा आणि भयंकर कौर्यापर्यंत . जीवनाचे सगळे रंग या कादंबरीभर फिरत राहतात .

एका ओसाड पडलेल्या लायब्ररीत जाऊन आपणच बसरमल होतो , आपणच ती पिवळी खिडकी होतो . आपणच दिलखुश सामोसेवाला होतो . आपणच मंगणची आई होतो आणि आपणच बुरशी लागलेली पुस्तकं होऊन स्वतःचं मरणं पाहतो . तरीही आपल्यातील 'मी ' मात्र अजिबात मरत नाही .
Format:

Publisher: