Id SKU Name Cover Mp3
Peshawaitil Kalapahad audiobook


250 500
Download Bookhungama App

पेशवाईतील काळापहाड - बाबुराव अर्नाळकर

Description:

काळापहाडच्या कथा' या बाबुराव अर्नाळकर लिखित कथाशृंखलेमधील पुढील कथा, ऑडिओबुक स्वरूपात! पेशवाईतील काळापहाड! पुतळाचे अपहरण! सर्जेरावाला लोहगडातील तळघरात बंद करून दोन दिवस झाले होते. त्या जागेत सूर्यप्रकाश प्रवेश करू शकत नसल्यामुळे सर्जेरावाला काळावेळाचे भान राहिले नव्हते आणि आपण कितीतरी दिवस त्या अंधारकोठडीत पडलो आहोत असे त्याला वाटत होते. बाहेर दिवस आहे की रात्र आहे हे समजण्यास काही मार्ग नव्हता. पण ज्यावेळी त्याला अन्नपाणी देण्यात येत असे त्यावेळी तो दिवस असावा असे तो अनुमान करीत असे. त्या भयानक काळोखातही तो भरपूर खात होता, झोपत होता आणि विचारही करीत होता. झोप पूर्ण झाली की तो त्या अंधारकोठडीत फेऱ्या घालीत असे. पण ती कोठडी इतकी लहान होती, की त्याच्यासारख्या उंच माणसाला तेथे आरामाने हातपाय पसरून झोपणेही अवघड होते. जे काही घडले त्याबद्दल तो पश्चात्ताप करीत नव्हता किंवा त्याला खेदही होत नव्हता. तो मोत्याचा कंठा हस्तगत करण्याची कामगिरी त्याने जेव्हा स्वीकारली तेव्हाच आपला मार्ग किती धोक्याचा आहे याची त्याला जाणीव होती. त्यामुळेच त्याचा डाव फसल्यानंतर त्याने त्याच्या अदृष्टांत विधात्याने जे काही लिहिले असेल ते भोगण्याची तयारी केली होती. किल्लेदार गडावर आल्यानंतर काय घडेल? इतरांना दहशत बसावी म्हणून ते आपला शिरच्छेद करून आणि आपले मुंडके भाल्याच्या टोकाला बसवून ते किल्ल्याच्या तटावर लावतील काय? कंठा हस्तगत करणाऱ्या इतरांना चांगली दहशत बसावी म्हणून आपणाला किल्लाच्या महाद्वाराबाहेर हत्तीच्या पायाखाली चिरडतील काय? की ज्या किल्लेदाराची न्यायदानाच्या बाबतीत अतिशय ख्याती होती ते आपणाला कोणाचा तरी भाडोत्री शागीर्द समजून सोडून देतील? पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी हे इ-बुक आवर्जून खरेदी करा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि