250 500
Download Bookhungama App

भाव हरीपाठ - Manisha Pendse

Description:

नमस्कार श्रोतेहो!
 
श्री ज्ञानेश्वरमाऊलींचा हरिपाठ - त्यांच्या प्रासादिक रचनांमुळे सोपा वाटला तरी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने गहन  आहे. अनेक सत्पुरुषांच्या निरूपणांचा आधार घेऊन 'भावहारिपाठ' तयार केला आहे. हरिपाठाच्या २८ अभंगांचा सांगीतिक प्रवास 'हरिपाठी स्थिरावल्यामुळे' शक्य झाला आहे. 
 
श्री. तुकाराम माउलींचा 'सुंदर ते ध्यान' हा अभंग व हरिपाठाचे अभंग - असे सर्व अभंग शास्त्रीय संगीतावर आधारित वेगवेगळ्या चालीत बांधलेले आहेत व ते सर्व अभंग 'हरी ॐ विठ्ठला' च्या संकीर्तनाच्या अनुसंधानात एकसूत्रीत केले आहेत. ज्ञानेश्वर माउलींच्या मुखारविंदातून उद्गलीत झालेल्या या अक्षर-काव्याविषयी असलेली पावित्र्याची भावना जपण्याची काळजी घेतली आहे. ' हरिपाठी गेले ते निवितांची ठेले' अशी परमशांतीची प्राप्ती करविणारे हे काव्य आपल्या समोर ठेवीत आहे.  
 
धन्यवाद 
 
सौ. मनीषा पेंडसे 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि