Id SKU Name Cover Mp3
Akherache Aatmacharitra


250 500.00
Download Bookhungama App

अखेरचे आत्मचरित्र - राजेंद्र बनहट्टी

Description:

राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या अखेरचे आत्मचरित्र या कादंबरीला महाराष्ट्र शासनाच्या १९८२ सालच्या सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही कादंबरी म्हणजे एका वठलेल्या म्हाताऱ्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे. बनहट्टी यांच्या खास शैलीमुळे वाचक कादंबरीत गुंतून राहतो.प्रस्तावना


‘अखेरचे आत्मचरित्र’ ही मराठीतील एक अनोखी कादंबरी आहे. फसवे नाव असलेली ही कादंबरी म्हणजे एका वठलेल्या म्हाताऱ्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे. तिचे स्वरूप आत्मचरित्राचे आहे पण आत्मा मात्र कादंबरीचा आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या आणि जीवनाच्या सर्व गहिऱ्या रसांचा आस्वाद घेणाऱ्या एका उच्च मध्यमवर्गीय वृद्धाची ही रसरशीत कथा आहे. या म्हाताऱ्याच्या जीवनात सांगण्यासारखे असे काहीही घडलेले नाही. तरी तो आपली जीवनकथा सांगताना कुठेही अडत नाही. रुळावरून गाडी जावी तशी ही कथा पुढे जात राहते कारण त्या म्हाताऱ्याने स्वतःच्या चवीसाठी जसा ‘लोणंबा’ हा आंबटगोड आगळा पदार्थ तयार केला आहे; तशीच एक चटकदार, खमंग आणि खट्याळ अशी जीवनदृष्टी त्याने स्वतःसाठी सहजगत्या निर्माण केलेली आहे. प्रचंड दीर्घायुष्य लाभलेल्या या म्हाताऱ्याला ‘कशासाठी जगायचे’ हा प्रश्र कधी पडत नाही. ‘जिवंत माणसाने जगायचे असते. तो दुसरे काय करणार!’ असे त्याचे सरळ उत्तर आहे. साध्या साध्या आशयगर्भ प्रसंगांतून ही कादंबरी फुलत जाते आणि अथपासून इतिपर्यंत मानवी मनाच्या क्रीडेत मन गुंतवून ठेवते. कादंबरीच्या शैलीला पिकल्या फळाची गोडी आहे. साध्या, सरळ, रसाळ शैलीमध्ये राजेन्द्र बनहट्टी यांनी नव्वदीतल्या जख्ख म्हाताऱ्याचे जे अफलातून चित्र रंगवले आहे ते मराठीत तरी अपूर्व ठरावे. ही म्हाताऱ्याची आत्मकथा इतकी अस्सल आणि बेमालूम वठलेली आहे, की ही कादंबरी आहे की आत्मचरित्र याचा संभ्रम पडतो. या संभ्रमातच या कादंबरीचा सच्चेपणा आणि यश साठवलेले आहे.’’

- शंकर पाटील


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि